मलकापूर 🙁 उमेश ईटणारे ) मलकापुरातील सहा नवदुर्गा मंडळाच्या आकर्षक देखाव्यांनी मलकापूरच नव्हे तर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 03 ऑक्टोंबर रोजी दुर्गा देवीची स्थापना झाली. गणपती विसर्जनानंतर, दुर्गा देवीची स्थापना करणारे मंडळे महिनाभरापूर्वीच दुर्गादेवीच्या आगमनाच्या तयारीला लागले होते. दरवर्षी मलकापूर शहरातील अनेक दुर्गा मंडळ आकर्षक देखावे सादर करत असतात. यावर्षीही त्यांनी उत्कृष्ट देखावे सादर करून मलकापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
उत्कृष्ट देखावे सादर करणारे मंडळे कोणती? आणि कोणत्या मंडळाने कोणता देखावा सादर केला हे आपण खालील बातमी वाचणार आहोत..
1 ) पुरोहित कॉलनी मित्र मंडळाने माँ वैष्णोदेवी यांचा देखावा सादर करून संपूर्ण संपूर्ण मलकापूरकरांचे लक्ष वेधले आहे. या देखाव्यामध्ये वैष्णव देवी येथील प्रति गुफा तयार करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला पोते आणि व्हाईट सिमेंट चा वापर करून डोंगर तयार करण्यात आला आहे. त्यात गणेशाची सुबक मूर्ती बसवण्यात आले आहे. वरच्या बाजूला पृथ्वी दाखवण्यात आली आहे.पृथ्वीच्या चौरस बाजूला कापसाचा वापर करून ढगाळ आभाळ तयार करण्यात आले आहे. हा देखावा तयार करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.
2 ) सोमेश्वर मित्र मंडळ ( जाधववाडी ) यांनी साकारला साडेतीन शक्तीपीठ यांचा आकर्षक देखावा
साडेतीन शक्तिपीठांचा आकर्षक देखावा येथील सोमेश्वर मंडळाने साकार केलेला यावेळी पहायला मिळत आहे. त्यात माहुर गडावर निवास असलेली माता रेणुकाई, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूर निवासिनी आई महालक्ष्मी आणि अर्धशक्तीपिठ म्हणून प्रसिद्ध असलेली वणी गडावरील आई सप्तश्रृंगी या शक्तिपीठांचे दर्शन घडविणारा उत्कृष्ट देखावा नागरिकांचे आकर्षण वाढवत आहे. यात विशेष म्हणजे या तिन्ही शक्तिरूपांचे दर्शन घेण्यासाठी
भक्तांना एका खडतर वाटेतून प्रवास करावा लागतो, अंधारलेल्या भुयारातून,विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाट
मोठ्या हिमतीने प्रवास करावा लागतो.वाटेत अनेक संकटे, अडथडे येतील,राक्षसांशी सामना होईल भुतं-पिशाचं सामोरे जाव लागेल. यासर्व कठीण प्रसंगात टप्यात टप्यावर शक्तीचे
प्रतीक असलेल्या साडेतीन शक्तिपीठांची मान्यता आणि अपार श्रद्धा असलेल्या माता रेणुका, आई तुळजाभवानी,
सात शिंगे असलेली देवी महालक्ष्मी हे शक्तीचे रूप आहे
दर्शन घेत घेत भक्तगणांना आंतरीक शक्ती जागृत झाल्याची अनुभूती येते. हा देखावा पाहण्यासाठी शहरभरातील नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहे. या देखाव्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून परिश्रम घेतले आहे.
3 ) बन्सीलाल नगर मित्र मंडळाने सागरला प्रति तुळजापूरचा देखावा!
येथील बन्सीलाल नगर मित्र मंडळाने प्रति तुळजापूरचा देखावा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पृष्ठ, कापड, प्लास्टिक कागद, कलर पेंटिंग, याचा वापर करून सुंदर तसेच प्रती तुळजापूरचा देखावा तयार करून बन्सीलाल नगर मित्र मंडळ दरवर्षी नवनवीन आकर्षक देखावे तयार करत असते. देखावा तयार करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
4 ) कीर्ती गणेश मंडळ ( जुनेगाव ) यांनी सुद्धा उत्कृष्ट देखावा तयार केला आहे. प्रवेशद्वारावर कापसापासून डोंगर तयार केलेला आहे त्यात बाबा महाकाल ची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यानंतर मागील बाजूला दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे. दुर्गादेवीच्या चौरस बाजूला पारंब्या लटकवलेल्या आहेत. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. देखावा तयार करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
5 ) श्रीकृष्ण क्रीडा मंडळानी होते आणि लाकडी बांबू पासून गुफा तयार करून त्यात उंचावर देवीची स्थापना केली आहे. दुर्गा देवीचे दर्शन घेण्यासाठी अंधारातून गुफेत जावे लागते, गुफे मध्ये लहान चिमुकले राक्षसी रूपात येऊन घाबरण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर सीडी चढून उंचावर जाऊन दुर्गा मातेचे दर्शन होते. हा देखावा आकर्षक ठरत असून नागरिक बघण्यासाठी गर्दी करत आहे. देखावा तयार करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
6 ) मलकापूरची कुलस्वामीनि या मंडळाचे हे पहिलेच वर्ष असून त्यांनी उत्कृष्ट देखावा तयार करून संपूर्ण मलकापूरकरांचे लक्ष वेधले आहे. दुर्गा देवीची स्थापना करण्यासाठी या मंडळाने भव्य दिव्य असा आकर्षक मंडप उभारला त्यात दुर्गा देवीची सुंदर आणि सुबक मूर्तीची स्थापना केली.
या सर्व मंडळांनी उत्कृष्ट देखावे तयार करून मलकापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांची लक्ष वेधले आहे.