मोताळा :- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३२ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रवि रमेश निंबोळकर (वय ३२) हे सकाळी शेतात जाण्यासाठी दुचाकीने गट क्र. २४१ दाभा रस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हातावर आणि दंडावर गंभीर जखमा झाल्या. निंबोळकर यांनी वेळीच आरडाओरड केल्याने अशोक काटे यांनी मदतीला धाव घेतली, ज्यामुळे बिबट्या पळून गेला आणि मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी नागरिकांनी बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीती व्यक्त केली असून वनविभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.