Headlines

“शिस्त की उद्धटपणा? – मलकापूर पोलिसांची नागरिकांना अश्लील शिवीगाळ; संतप्त पत्रकारांचा ठणकाव” कर्तव्यदक्ष एस.पी. तांबे साहेब हे या पोलिसांना बोलण्याची पध्दत शिकवतील का ?

मलकापूर :- ‘सर्वसामान्यांचा रक्षक’ अशी ओळख असलेल्या पोलिसांच्या वर्तनावर मलकापूर शहरातील नागरिक आणि पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. काल रात्री शहरात दोन गटांत वाद होण्याची शक्यता असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केला, पण त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या बेजबाबदार आणि असभ्य वर्तनामुळे ‘जनतेचे मित्र’ ही प्रतिमा धुळीस मिळाली आहे.
विशेष म्हणजे, या पोलीस कर्मचाऱ्याने थेट पत्रकार दीपक इटणारे यांच्या लहान भावाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारावर घटनास्थळी असलेले पत्रकार दीपक इटणारे यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलीस कर्मचाऱ्याला ठणकावले. संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आश्चर्य म्हणजे, घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी असतानाही संबंधित कर्मचाऱ्याला रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही, हे विशेष नोंद घेण्याजोगे आहे. पोलिसांच्या वर्दीत असलेला कर्मचाऱ्याचा हा उद्दामपणा आणि लोकांप्रती असलेला तुच्छभाव निंदनीय असून अशा वृत्तीच्या कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांकडून व्यक्त होत आहे.
“आमचं संरक्षण करावं यासाठी पोलीस आहेत की शिवीगाळ ऐकण्यासाठी?” असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बडगा सर्वसामान्यांवर चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाला मूक संमती देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाची किंमत मोजावी लागू शकते, असेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!