Headlines

बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल!

खामगावः तालुक्यातील गणेशपूर येथे बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव राजू कचरू मोरे (४८) असे आहे.

यासंदर्भात गावातील मगन कचरू मोरे यांनी हिवरखेड पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार, राजू मोरे यांच्यावर गणेशपूर येथील ग्रामीण कोकण बँकेचे ६० हजार रुपये कर्ज थकीत होते. यावर्षी पिकाचे उत्पन्न समाधानकारक न झाल्याने त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळेच त्यांनी गावातील रवी भारसाखळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *