Headlines

टायर फुटल्याने ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी टळली, धरणगाव उड्डाण पुलाजवळील घटना

मलकापूर : – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धरणगाव उड्डाणपुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकचे टायर फुटल्याने वाहन रस्त्यावर उलटले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात ९ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला. जळगावच्या दिशेने लोखंड घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक: GJ 10 TX 9369) महामार्गावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक उड्डाणपुलावर उलटला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी मदत करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. दरम्यान, ट्रकचालकाने अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!