खामगाव : ई-बाईकच्या डिकीत
ठेवलेले दीड लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मंगळवारी कोर्ट परिसरात ही घटना घडली. सुटाळा खुर्द येथील शेख खुर्शिद शेख तुराब (६३) यांनी २४ सप्टेंबर रोजी कॅनरा बँकेतून दीड लाख रुपये काढले. त्यांनी हे पैसे ई-बाईकच्या डिकीत ठेवले व कामानिमित्त कोर्ट परिसरात आले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या ई -बाईकची डिकी उघडून दीड लाख रुपये व कागदपत्र ठेवलेली बॅग लंपास केली. काम आटोपल्यानंतर शेख खुर्शिद हे बाईक घेवून फ्रेश अंडा सेंटर येथे आले. याठिकाणी डिकी उघडली असता पैसे दिसून आले नाही. त्यांनी शहर पोस्टेला धाव घेवून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला.