Headlines

हराळखेड शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला; नैसर्गिक मृत्यूची शक्यता!

इसोली :- बुलढाणा वनपरिक्षेत्रातील उदयनगर वर्तुळातील हराळखेड येथील एका शेतातील नाल्याजवळ ७ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता तीन ते चार वर्षांचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. इसोली येथील रहिवासी शेख रईस शेख मोती यांनी गट क्रमांक ८६ मध्ये बिबट्या मृत असल्याची माहिती वनविभागाला दिली. या माहितीनंतर वनाधिकारी, अमडापूरचे पशुधन विकास अधिकारी व्ही.बी. आवटे आणि चिखलीचे पशुवैद्यकीय अधिकारी एम.जी. गाढे घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा व घटनास्थळीच केलेल्या शवविच्छेदनानुसार बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सहायक उपवनसंरक्षक अश्विनी आपेट यांनीही ही माहिती पुष्टी केली.

बिबट्याच्या मृतदेहावर अंतिम सोपस्कार बुलढाणा येथील लाकूड आगारात पार पाडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!