Headlines

पलक परदेशी विभागीय शालेय सॉफ्ट-टेनिस क्रीडा स्पर्धेत विभागस्तरावर

मलकापूरः-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सॉफ्ट-टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाहेती जीन मलकापूर येथे करण्यात आले होते. स्पर्धेत तब्बल जिल्ह्यातील ३५ खेळाडूंनी सहभाग घेतला. यात स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेची खेळाडू कु. पलक शैलेंद्रसिंह परदेशी हिने उत्कृष्ट कामगिरी करून विजय संपादन केला. १७ वर्षे मुली वयोगटात कु. पलक शैलेंद्रसिंह परदेशी ने द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळवले. सॉफ्ट टेनिस खेळाची राष्ट्रीय खेळाडू कु. पलक परदेशी ने मागील वर्षी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पलक ने उत्कृष्ट खेळ करून पुन्हा एकदा विभागस्तरीय शालेय सॉफ्टटेनिस क्रीडा स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. शालेय सॉफ्ट टेनिस विभागीय क्रीडा स्पर्धा दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे होणार आहे.

या शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार, सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव विजय पळसकर, राजेश्वरजी खंगार, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. पलक ला स्कूल ऑफ स्कॉलर्सचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके, क्रीडा शिक्षक ओम गायकवाड, अजय शिंगणे, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. पलक च्या कामगिरीबद्दल शाळेचे संचालक अमरकुमार संचेती, मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *