Headlines

मलकापूर शहरात कचरा गाडी बंद; नागरिक त्रस्त – दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलणारी गाडी बंद असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्याची सुरूवात झालेली असल्याने डेंगू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका अधिक वाढला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कचरा गाडी बंद असल्याने काही नागरिकांनी घरासमोर व रस्त्यालगत उघड्यावर कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीला कारणीभूत ठरत कचरा गाडी चालक व सफाई कामगारांनी पगारवाढीची मागणी करत काम बंद ठेवले असल्याचे समजते. शहरातील आरोग्य व्यवस्था ढासळू नये आणि संसर्गजन्य रोगांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कचरा गाडी नियमित सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!