मलकापूर: खामखेड परिसरातील रेल्वे रुळांवर रविवारी रात्री एका अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. लोको पायलट चालकांनी खामखेडचे उपस्टेशन अधीक्षक दुष्यंत मधुकर पिटुरकर यांना रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास याची माहिती दिली.
मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅकमन समाधान भगवान पंडित यांनी या घटनेची नोंद केली. मृत व्यक्तीची उंची साधारण ५ फूट, सडपातळ शरीरयष्टी, काळसर रंग, दाढी वाढलेली व डोक्याचे केस लांब असल्याचे सांगण्यात आले आहे. अंगावर पांढऱ्या रंगाचा फाटलेला शर्ट व निळसर रंगाची फाटकी अंडरविअर होती. संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मलकापूर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.