Headlines

हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव येथील घटना!

शेगाव – हुंड्याच्या पैशावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या प्रकरणी तिच्या पतीसह नणंदांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी संगनमत करून तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची सक्ती केली. यास नकार दिल्याने तिचा छळ करण्यात आला व तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. फिर्यादी सौ. मेघा अंकुश चव्हाण (वय २६, रा. विलास नगर, लोहार लाईन, अमरावती) यांनी ५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपी पती अंकुश बबलू चव्हाण, नणंद कल्पना बबलू चव्हाण आणि निकीता बबलू चव्हाण (सर्व रा. विलास नगर, लोहार लाईन, अमरावती) यांनी २०२१ ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फिर्यादीवर सतत अत्याचार केला, असा आरोप आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय करूटले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!