
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या : आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचा संशय; रोहिणखेड येथील घटना
रोहिणखेड :- येथील श्रीकृष्ण संपत लवंगे (वय ५६) यांनी सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीकृष्ण लवंगे यांच्याकडे शेती नसून, त्यांनी राजर्षी शाहू बँकेकडून एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. तसेच, त्यांच्या नावावर इतर खाजगी कर्जही असल्याची माहिती त्यांच्या…