
भारतीयांना प्रोत्साहित, प्रेरित करण्यासाठी वंदे मातरम् या दिव्यमंत्राची आवश्यकता – सौ आरती ताई तिवारी
मलकापूर 14/10/2024 दीडशे वर्षांच्या गुलामीचे जोखड झुगारून देण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या प्राणशक्तीला जागृत करण्यासाठी भारतभर अनेक स्फूर्तीगीते निर्माण झाली .त्यातील एक गीत म्हणजे ‘वंदे मातरम् ‘. बंकिंमचंद्र चटर्जी यांनी 1875 साली रचलेले हे गीत भारतीयांच्या मनाची प्राणशक्ती झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम करीत होते.हे शब्द वेद मंत्रांहूनही पवित्र…