Headlines

मलकापूर मतदारसंघात अँड. हरीश रावळांच्या भूमिकेवर लक्ष: निवडणूक लढविणार की माघार घेणार?

मलकापूर:-  (उमेश इटणारे )येथे सध्या अँड. हरीश रावळ यांच्या भूमिकेबाबत मोठी उत्सुकता आहे. २०१९ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानंतर रावळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आता काँग्रेसकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, ज्यामुळे काँग्रेसमध्ये चिंता वाढली आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे योगदान आणि त्यांनी केलेली आंदोलने पाहता, पक्षाने त्यांना अपेक्षित संधी दिली असती, तर निवडणुकीत…

Read More

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलकापूरात एकाकडून ८ लाख रुपये जप्त!

मलकापूर:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीकडून ८ लाख १२ हजार ८७५ रुपये जप्त केले. ही कारवाई १ नोव्हेंबर रोजी करण्यात आली, ज्या वेळी एफएसटी पथक आणि महसूल नायब तहसीलदारांनी रक्कम बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांना संशयित व्यक्तीच्या हालचालींची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी एपीआय ईश्वर वर्गे यांच्या…

Read More

बुलढाणा जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी: जुन्या चेहऱ्यांचा विश्वास आणि नव्या उमेदवारांची ताकद

मलकापूर (दिपक इटणारे): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात महायुतीने आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी वेगवेगळ्या रणनीती अवलंबल्या आहेत. महायुतीने अधिकतर ठिकाणी जुन्या आमदारांवर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने संजय कुटे, श्वेता महाले आणि आकाश फुंडकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे, तर शिंदे गटाने संजय गायकवाड आणि डॉ. संजय रायमुलकर यांना पुन्हा मैदानात उतरवले…

Read More

रोटाव्हेटरमध्ये अडकून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील घटना!

मलकापूर :- ३० ऑक्टोबर, बुधवारी, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भाडगणी येथील २७ वर्षीय संदीप जयवंत खोडके याचा शेतात काम करत असताना रोटाव्हेटरमध्ये अडकून मृत्यू झाला. संदीप हा एक एकर शेती करीत होता, आणि त्याच्यावर कर्जाचे मोठे ओझे होते. पावसामुळे शेतीची स्थिती गंभीर झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना कामगार मिळवणेही कठीण झाले. संदीप शेतात काम करत असताना…

Read More

मलकापूर शहर पोलिसांचे चोरट्यांपासून पासून सावध राहण्यासाठी नागरिकांना सूचना! पोलीस निरीक्षक गिरी यांचे नागरिकांना आव्हान

  ( उमेश ईटणारे ) मलकापूर :- मलकापूर शहराचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी नागरिकांना सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शहरातील सर्व नागरिकांनी खालील उपाययोजना लक्षात ठेवाव्यात: 1. शेजाऱ्यांची मदत: बाहेरगावी जात असताना आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करा, ज्यामुळे घराची सुरक्षा वाढेल. 2. मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता: मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. घरात…

Read More

बुलढाणा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात: Amazon, Donatekart आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेची पुढाकार

बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर व ग्रामीण भागात १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पुर ओढवला. नळगंगा धरणातील पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने दाताळा आणि मलकापूर गावांत पाण्याचा शिरकाव झाला, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे अन्न-धान्य वाहून गेले. या परिस्थितीत अनेक कुटुंबं अडचणीत सापडले आहेत. बरेच कुटुंबाचा दाताळा गावातील शाळेत तात्पुरता निवारा करण्यात आला आहे….

Read More

“एकच वादा राजू दादा” विद्यमान आमदार राजेश एकडे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी मतदार व कार्यकर्त्यांचा उसळला जनसागर; आमदार राजेश एकडे यांचे कार्य उल्लेखनीय – मुकुल वासनिक

मलकापूर( उमेश इटणारे ):- मलकापूर-नांदुरा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार राजेश एकडे यांनी विकासकामांमधून एक ठोस पायाभूत परिवर्तन घडवून आणले आहे. २५ वर्षांतील प्रलंबित प्रश्नांवर योग्य पावले उचलून त्यांनी केवळ ५ वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेला विश्वास त्यांनी कायम…

Read More

ट्रक-ट्रॅक्टर अपघातात एक महिला ठार; तीन महिला गंभीर जखमी ; मलकापूर – नांदुरा रोडवरील घटना!

मलकापूर:- आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वडी फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि ट्रॅक्टरच्या या धडकेत एक महिला जागीच ठार झाली, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली हा अपघात सकाळी घडला, परंतु अद्याप मृत महिलेचे नाव समजू…

Read More

सोयाबीन गंजीला आग, अज्ञाताविरुध्द गुन्हा; शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी!

नांदुरा: शेतकऱ्याने ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबीन गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्यामुळे १२ पोते सोयाबीन आणि ताडपत्री जळून खाक झाली. या घटनेत शेतकऱ्याचे ४२ हजारांचे नुकसान झाले आहे. २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाकुड शीवाऱ्यातील उध्दव हरीचंद्र सित्रे यांच्या शेतात ही घटना घडली. सित्रे यांनी आपल्या ७४ आर शेतीत सोयाबीन पेरले होते, ज्याची गंजी…

Read More

राजेश एकडे यांच्या उमेदवारी अर्जासाठी उद्या भव्य रॅलीचे आयोजन; मुकुल वासनिक साधणार जनतेशी संवाद

मलकापूर: महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि मलकापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार, राजेश एकडे, यांचा उमेदवारी अर्ज उद्या, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माननीय मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत दाखल होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मलकापूर येथील जनता कॉलेजच्या पटांगणावर होईल, जिथे सर्वप्रथम मुकुल वासनिक जनतेशी संवाद साधतील आणि मार्गदर्शन करतील. त्यानंतर भव्य नामांकन…

Read More
error: Content is protected !!