Headlines

शासकीय अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी – मलकापूर नगरपरिषदेच्या अभ्यासिकेचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे

मलकापूर (प्रतिनिधी) –मलकापूर नगरपरिषदेकडून “40-बिद्या” परिसरात स्पर्धा परीक्षार्थींसाठी शासकीय अभ्यासिका बांधण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अभ्यासिका सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मलकापूर विधानसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मा. आमदार चैनसुख संचेती यांना अर्ज सादर करून अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली…

Read More

मलकापूरचे माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांची राजकारणातून निवृत्ती; ३२ वर्षांच्या प्रामाणिक सेवेला दिली निरोपाची भावना

मलकापूर( दिपक इटणारे ): मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नारायणदास निहलानी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी झोकून दिलेले कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे. ३२ वर्षांचे समर्पित कार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी…

Read More

घरून स्कुटी घेऊन गेले पण अजूनही परत आले नाही, मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील ५२ वर्षीय इसम बेपत्ता!

मलकापूर :- उमाळी (ता. मलकापूर) येथील रहिवासी राजेंद्र पुंजाजी पाखरे हे २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.राजेंद्र पाखरे कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले असून, त्यांची स्कुटी (क्रमांक एमएच-२८-बीएफ-७९१२) देखील गायब आहे. याबाबत त्यांच्या वडिलांनी, पुंजाजी गनपत पाखरे  रा. उमाळी), २६ डिसेंबर रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस…

Read More

रखडलेल्या बिलांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा घंटानाद; आमदार संचेतींच्या मध्यस्थीने कर्मचाऱ्यांना दिलासा

मलकापूर:- विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूर शहरातील कॉन्ट्रॅक्टवरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. घंटागाडी व कचरागाडीसह आमदार चैनसुख संचेती यांच्या कार्यालयावर त्यांनी भव्य मोर्चा काढला. रखडलेल्या बिलांच्या समस्येमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करत आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी आरोप…

Read More

शांती आरोग्यम् हॉस्पीटलच्या इमारतीला एका महिन्यात जमिनदोस्त करण्याचे आदेश; अजय टप यांच्या मागणीला यश

  मलकापूर : चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरमध्ये उभारण्यात आलेल्या शांती आरोग्यम् हॉस्पीटलची इमारत अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्यात आल्याने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २७ डिसेंबर रोजी न.प. मुख्याधिकारी, प्रशासक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले होते. यानंतर…

Read More

इंजि.सौ.कोमलताई तायडे यांच्या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेस २०२५ च्या कॅलेंडरचे कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते विमोचन

  मलकापूर :- आपल्या कंपनीच्या कॅलेंडरवर १२ महानायीकांच्या जिवनपटाची माहिती प्रसारीत करीत त्यांच्या कार्याला आपण उजाळा दिला असून कॅलेंडरचा सर्वाधिक उपयोग हा महिला वर्गाकडून होत असून महिला वर्गाला महानायीकांच्या जिवनपटाची माहिती देवून समाज उपयोगी उपक्रम राबवित असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांनी एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या २०२५ च्या दिनदर्शिकेच्या विमोचन प्रसंगी केले. इंजि.सौ.कोमलताई सचिन…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख जयंती आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण

मलकापूर :- दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे भारताचे महान कृषितज्ञ आणि शेतकऱ्यांचे नेते डॉ. पंजाबराव देशमुख यांची 126 वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या सोहळ्यात भारताचे माजी पंतप्रधान आणि नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे देशासाठी केलेले बहुमूल्य योगदान स्मरण करण्यात…

Read More

शांती आरोग्यम् हॉस्पीटलच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी – अजय टप यांची मांगणी

मलकापूर :- शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित हॉस्पीटलचे झालेले बांधकाम हे अवैध व न.प.ची कुठलीही परवानगी न घेता करण्यात आले असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी न.प.मुख्याधिकारी, न.प.प्रशासक तथा तहसीलदार मलकापूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर शहर न.प. हद्दीत येत असलेल्या चाळीसबिघा…

Read More

नूतन विद्यालयाच्या सोनल खर्चेची राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी

मलकापूर: नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील विद्यार्थीनी कुमारी सोनल गणेश खर्चे हिने राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवून शाळेचे व संपूर्ण शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.ही स्पर्धा मध्य प्रदेशातील देवास येथे २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान पार पडली. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर मात करत…

Read More

भरधाव दुचाकीची ऑटोला धडक, ऑटो उलटून चालकासह पाच जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : भरधाव पल्सर मोटरसायकलने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाले. हा अपघात २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बोदवड रोडवरील टॉवरजवळ घडला.पल्सर चालक सोपान कांडेलकर यांच्या निष्काळजीपणामुळे रिक्षातील प्रवासी अलका निकम, कैलास निकम, सुरेश अढाव, शोभा भगत, अनिता वराडे आणि रिक्षाचालक अशोक वराडे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर…

Read More
error: Content is protected !!