शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचनाच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधणे म्हणजे विकास – चैनसुख संचेती रस्ते आणि पूल बांधण्याला विकास म्हणता येत नाही पत्रकार परिषदेतून माजी आ. संचेती यांचा विद्यमान आमदारांवर टीका..
मलकापूर (उमेश इटणारे ):- विधानसभा मतदारसंघातील विकासाची नवी संकल्पना मांडत भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी आज आपल्या वचननामा पुस्तिकेचे अनावरण केले. या वचननाम्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचन या महत्त्वाच्या चार स्तंभांवर आधारित सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. यावेळी बऱ्हाणपूरचे माजी महापौर अनिल भोसले, भाजपा नेते मोहन…