
शासनाची कडक नियमावली फोल! परीक्षा केंद्र असुरक्षित! होमगार्ड सावलीत, कॉपी माफिया मोकाट, शासनाचा पगार – पण काम शून्य! बेजबाबदार होमगार्डवर कधी होणार कारवाई?
मलकापूर ( दिपक इटणारे ) – दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, या उपाययोजना कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. विशेषतः मलकापूर शहरातील काही परीक्षा केंद्रांवर ड्युटीवर असलेले होमगार्डच सुरक्षेला हरताळ फासत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काही परीक्षा…