Headlines

वान नदीपात्रातील शंभू डोहात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

संग्रामपूर : वारी भैरवगड येथील वान नदीपात्रातील शंभू डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी जहाँ. येथील २२ वर्षीय रामसिंग दगडूसिंग सोळंके हा अविवाहित तरुण गुरुवारी मामा-भासाच्या डोहालगत शंभू डोहात तरंगताना आढळून आला. घटनास्थळ तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात…

Read More

उत्खननात श्रीविष्णु आणि लक्ष्मीदेवी यांची मूर्ती सापडली !

सिंदखेड राजाः शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याचे काम अनेक महिन्यांपासून चालू आहे. त्यांच्या समाधीसमोरच उत्खनन करतांना श्रीविष्णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्य मूर्ती सापडली आहे. ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत सुंदर मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याची चर्चा आहे. आगामी…

Read More

एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटला, सुदैवाने प्रवाशी बचावले

बुलडाणाः बुलडाणा ते सैलानी एसटी बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याची घटना दि. २० जून रोजी ५:३० वा. दरम्यान शहरातील भवटे हॉस्पिटल समोर घडली आहे.एसटी बस मध्ये तब्बल ५० ते ६० प्रवासी होते मात्र एसटी बस चालकाने एसटीवरील नियंत्रण पकडून बस रस्त्याच्या बाजूला लावली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. एसटी बसचा रोड तुटल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली…

Read More

किरकोळ वादातून डोक्यात बिअरची बाटली फोडली,दोघे जखमी, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा : येथील शेंदुर्जन मार्गावर असलेल्या छत्रपती हॉटेलवर किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत. यामध्ये चार व्यक्तीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये १८ जून रोजी सोनू ऊर्फ साहिल दीपक राजपूत आणि पवन गोपाल सिंग डागोर (रा साखरखेर्डा) हे दुपारी ४:३० वाजता आले. येथील कामगार शैलेंद्र सुधाकर शेळके यांच्यासोबत वाद…

Read More

शेतात बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला; वासरू ठार, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

धामणगाव बढे : गुरांसोबत बांधून असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना धामणगाव बढेनजीक पांगरखेड शिवारात १६ जूनच्या रात्री घडली. १७ जून रोजी सकाळी वासराचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच दिनकर बढे यांच्या शेतात दोन बैल, गाय आणि एक वासरू बांधलेले होते. या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. बढे यांनी वासराचा शोध…

Read More

पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा वादळी वाऱ्यामुळे मृत्यू, पाळणा टिनपत्र्यांसह उडून गेल्याने घडली दुर्घटना : अनेक घरांची झाली पडझड, चिखली तालुक्यातील घटना

चिखली:- तालुक्यात ११ जूनच्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यावर झोपलेली अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसाट्याचा वारा सुटल्याने घरावरील टिनपत्र्यांसह लोखंडी अँगल व त्याला बांधलेला झोका उडून सुमारे २०० फूट अंतरावर पडल्याने झोक्यात झोपलेल्या चिमुकलीचा अंत झाला आहे. सई भरत साखरे असे या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या…

Read More

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट, बॅटरीक फुटून ऍसिड उडाल्याने पितापुत्र जखमी, मलकापूर शहरातील धक्कादायक घटना

मलकापूर:- इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी फुटून त्यामधील ऍसिड उडून पितापुत्र जखमी झाल्याची घटना काल दि. 11 जून रोजी रात्री 12.30 च्या सुमारास शहरातील पद्मालय सोसायटीत घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पद्मश्री डॉक्टर व्हि बी कोलते अभियांत्रिक महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य विशाल सुभाष वैद्य शहरातील पद्मावत सोसायटी वास्तव्यास आहे. विशाल वैद्य यांच्याकडे इलेक्ट्रिक स्कुटी…

Read More

दर्शनासाठी गेलेल्या नांदुऱ्यातील 21 वर्षीय तरुणाचा ओंकारेश्वर येथे पाण्यात बुडून मृत्यू

नांदुरा : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या येथील एका 21 वर्षीय युवकाचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना 6 जून रोजी उघडकीस आली आहे. ओम संजय पेठकर असे या युवकाचे नाव आहे. येथील रहिवासी ओम पेठकर वय 21 | हा काही मित्रांसोबत ओंकारेश्वर येथे देव दर्शनासाठी गेला होता. दरम्यान, 5 जून रोजी…

Read More

विदर्भ क्रिकेट संघटने द्वारा 15 वर्षाखालील मुलींचे विदर्भस्तरीय प्रशिक्षण संपन्न

मलकापूर दिनांक 6 – विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरच्या वतीने विदर्भातील जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी 15 वर्षाखालील मुलीसाठी एक महिना कालावधीचे प्रशिक्षण शिबीर सहकार विद्या मंदिर बुलडाणा येथे आयोजीत करण्यात आले होते,या शिबीराचा समारोप दि 5 जून रोजी संपन्न झाला .शिबीरात विदर्भातील 27 खेळाडूंची निवड प्रत्येक जिल्हातील खेळाडूंसाठी निवड चाचणीचे आयोजन करून व्हीसीएच्या सिलेक्टर द्वारे…

Read More

सोळा वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेत संपवली जीवन यात्रा

बुलडाणा :- एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 7 जूनला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील महावीर नगर भागात उघडकीस आली आहे. ( आदित्य संजय गिरी वय 16 )असे मृतकाचे तरुणाचे नाव आहे. आदित्य हा शहरातील महावीर नगर भागात परिवारासह वास्तव्यास आहे. आदित्य 9 व्या वर्गात शिक्षण घेत…

Read More