Headlines

घटस्थापनेच्या दिवशी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा शॉक लागून मृत्यू! डोलारखेड येथील घटना

  जलंब : दोन युवकांना विद्युत तारेचा शॉक लागल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नजीकच्या डोलारखेड येथे घडली. येथून जवळच असलेल्या डोलारखेड येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गाची स्थापना करण्यात आली आहे. येथील एका सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी घटस्थापना होऊन आरतीही झाली. यानंतर शुभम गजानन देठे (वय २१) व…

Read More

रुग्णालयाचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

जांभोरा : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील राहेरी ते शेवली मार्गावर असलेल्या डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोकड, सीसी कॅमेरे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. जांभोरा येथे राहेरी येथील डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या मालकीचे रुग्णालय आहे. अज्ञात चोरट्याने ३० सप्टेंबरला मध्यरात्री रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत…

Read More

शेतातील पाळीव कुत्र्याला बिबट्याने केले ठार, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

दुसरबीड :- खंडाळा येथील शेतकरी ज्ञानदेव सखाराम दराडे यांच्या गट नंबर २३० व२३२ मध्ये कपाशी पिकाची लागवड केलेली असून, त्या कपाशी पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी कुत्रा पाळला होता. २७ सप्टेंबर रोजी रात्री कुत्रा शेतात असतांना बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. हाल्यात बिबट्याने कुत्राला जागीच ठार केले. सकाळी शेत मालक शेताला चक्कर मारण्यासाठी गेले…

Read More

सततची नापिकी, डोक्यावर बँकेचे कर्ज, शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल! चिखली तालुक्यातील घटना

मेरा बु :- सततची नापीकी व कर्जबाजारी पणामुळे ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवाशी असलेले रामदास आनंदा गवते वय ५५ वर्ष यांच्याकडे मंगरुळ शिवारात गट नं. ३६९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी…

Read More

शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली मलकापूरच्या शिक्षकाची लाखांनी फसवणूक, आरोपीला पालघर जिल्ह्यातून अटक!

बुलढाणा :- ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो रुपये उकळून शिक्षकाची फसवणूक झाल्याचा प्रकार मार्च महिन्यात मलकापूर येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी एका भामट्याला अटक केली. शैलेंद्र लक्ष्मण गुळवे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यावरून, अज्ञात ठगबाज आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर, सायबर पोलीस ठाण्याचे…

Read More

माझ्यासोबत चल म्हणत तरुणीचा विनयभंग, संग्रामपूर तालुक्यातील घटना

संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात सार्वजनिक रस्त्यावरील पीठगिरणी जवळ १५ वर्षीय मुलाने १३ वर्षीय बालिकेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना २५ सप्टेंबरला सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना उघडकीस आली. गत अनेक दिवसांपासून एका १५ वर्षीय मुलाकडून १३ वर्षीय बालिकेचा पाठलाग सुरू होता.मुलीला माझ्यासोबत चल, तुला…

Read More

घरात खेळत असलेल्या चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला, चिमुकली गंभीर जखमी

बुलढाणाः घरात घुसून घरात खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला.ही घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी चिमुकलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनाबिया अजहर खान (रा. धाड) ही मुलगी आईसोबत मामाच्या गावी ढालसावंगी येथे आली होती. गुरुवारी दुपारी ती घरात खेळत असताना एका कुत्र्याने घरात प्रवेश…

Read More

पादचारी वृद्ध इसमाला अज्ञात वाहनाची धडक, वृद्धाचा मृत्यू!

खामगाव : अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या एका ७० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध इसमाला धडक दिली. यात पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ २२ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, ७० वर्षीय एक अनोळखी वयोवृद्ध इसम रस्त्याने जात असताना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ त्यास एका अज्ञात वाहनाने…

Read More

ईद-मिलादच्या मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे, अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल! वडनेर भोलजी येथील घटना

बुलढाणा :भारताचा शत्रू असलेला पाकिस्तान च्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ईद-मिलादच्या मिरवणुकीत घडली.दरम्यान, देश विरोधी पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशिल कोल्हे यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली की, १६ सप्टेंबर रोजी वडनेर भोलजी येथे…

Read More

सख्ख्या मावश्याची सालीच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर, रात्री झोपेत नको ते केलं, आरोपीला अटक!

मेरा बु.: घरात झोपेत असताना सख्ख्या मावशाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अशा मुलीच्या तक्रारीवरून ३२ वर्षीय आरोपी मावशाला अंढेरा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील घटनेची माहिती अशी की, आरोपी मुलीचे मावसा हे गेल्या २ दिवसापासून गावी आले होते. दरम्यान रात्री सर्वांनी सोबत…

Read More
error: Content is protected !!