ब्युटी पार्लर मध्ये घुसून महिनलेचा विनयभंग,आरोपीला अटक, खामगाव शहरातील घटना!

खामगाव :- ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेचा ब्युटी पार्लर मध्ये घूसून विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोपाल दुतोंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित महिला ४० वर्षांची आहे. महिलेचे खामगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. या … Read more

गळ्याला चाकू लावून वृध्देस लुटले,दीड लाखाचे दागिने लंपास, सिंदखेडराजा येथील घटना!

सिंदखेडराजा : येथील वृद्ध महिला देव दर्शनासाठी नातवा सोबत खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या असतांनाच त्यांच्या गळ्याला चाकू लाऊन दीड लाखाचे दागिने चोरट्याने लांपास केले आहे. सिंदखेडराजा येथील ६५ वर्षीय वृद्ध सुमनबाई मेहेत्रे ह्या आपल्या नातवाला घेऊन पांगरखेड रोडवरील खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी सकाळी सातच्या दरम्यान जात होत्या. दरम्यान खंडोबा रोडवरील नदीजवळ दुचाकीवरून दोन तरुण आले आणि … Read more

एकापाठोपाठ तीन सिलेंडरचा स्फोट, घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली, देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगावराजा :शहरातील चौंडेश्वरी मंदिर परिसरात कांतीलाल सुपारकर यांच्या बंद घराला शनिवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत ३ सिलिंडरचा स्फोट झाला. बंद घरात चाट भंडाराचे साहित्य तयार करण्यासाठी उपयोग होत होता. या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्री श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरात राहणारे कांतीलाल सुपारकर यांचे घरातून आगीचे लोळ निघू लागले. त्यावेळी शेजाऱ्यांच्या लक्षात … Read more

मलकापुरातील या परिसरात जमाबंदी आदेश लागू, नियमांचे पालन न केल्यास कारवाई

मलकापूर : उपोषणास बसलेल्या कोळी महादेव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्ट रोजी अचानकपणे शहरांमध्ये रास्तारोको केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी २ सप्टेंबरपर्यंत या परिसरामध्ये कलम १६३ (३) लागू केली आहे.उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, ३१ ऑगस्ट रोजी शहरांमध्ये आदिवासी कोळी महादेव … Read more

चांडक शाळेत आयुर्वेद व्यासपीठा तर्फे ‘कळी उमलतांना’ समुपदेशन कार्यक्रम संपन्न

मलकापूर (प्रतिनिधी): नगर सेवा समिती संचालित लीलाधर भोजराज चांडक शाळेत, दिनांक 31 ऑगस्ट रोजी आयुर्वेद व्यासपीठ बुलडाणा शाखा मलकापूर यांच्या वतीने ‘कळी उमलतांना’ या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या जपवणुकीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यार्थिनीच्या हस्ते यथोचित स्वागत करण्या आले. डॉ. रश्मी काबरा आणि डॉ. … Read more

नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू, तेल्हारा तालुक्यातील घटना!

संग्रामपूर : वान नदीपात्रात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील काकनवाडा येथे घडली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम कोठा येथील शुभम राजेश अहेरकर या युवकाचा वान नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल दांडगे तर्फे कक्षसेवक आकाश चौरपगार यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या … Read more

संताजी नगरातील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव दहीहंडी कार्यक्रम संपन्न

मलकापुर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम संताजी नगर येथील श्रीकृष्ण मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता बाल – महिला भजनी मंडळ वडगाव तिघे ता. जामनेर येथील भजनी मंडळांने भगवान श्रीकृष्ण यांच्या महंतीपर भजने सादर केली तद्नंतर जन्म अध्याय घेण्यात आला, देवाला गंध, अक्षदा,विडा अर्पण करून महाआरती करण्यात आली, … Read more

चिमुकल्यांना कमरेला बांधून मातेची तलावात उडी घेऊन आत्महत्या, खामगाव तालुक्यातील घटना

वृत्तसेवा खामगाव : पोटच्या दोन चिमुरड्यांना कमरेला बांधून पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने तालुक्यातील पिंप्री गवळी शिवारातील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर महिलेने कोणत्या कारणामुळे हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दहिगाव गावंडे … Read more

मलकापूर रेल्वे परिवारातर्फे आगळावेगळा उपक्रम, अपघातात मृत्यू पावलेल्या प्रायव्हेट सफाई कामगाराला 3 लाखांची मदत देऊन साजरा केला स्वतंत्रता दिवस!

मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वतंत्रता दिवस कार्यक्रम रेल्वे स्टेशन मलकापूर येथे उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी स्टेशन प्रबंधक श्री डी वी ठाकूर, आरपीएफ इन्स्पेक्टर श्री राणाजी आणि वेगवेगळ्या विभागाचे डेपो इन्चार्ज आपल्या सहकर्मीसह उपस्थित होते स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे रेल्वेचे प्रायव्हेट सफाई सुपरवायझर स्वर्गीय अनिल जी … Read more

ग्रामसेवकास शिवीगाळ करत मारहाण,एकाविरोधात गुन्हा दाखल! मेहकर तालुक्यातील घटना

डोणगावः मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे येथे ग्रामसेवकाच्या कामात व्यत्यय निर्माण करून, त्यास मारहाण केल्याप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. ग्रामसेवक दीपक भानुदास हुंबाड (५०) हे ग्रामपंचायत कार्यालयात असताना अमोल नामदेव महाजन (रा.अकोला ठाकरे) हे कार्यालयात आले., त्यांनी ग्रामसेवक दीपक हुंबाड यांना मारहाण करून शिवीगाळ … Read more

error: Content is protected !!