Headlines

“कानमंत्र” देण्याच्या बहाण्याने निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी लंपास; आरोपी सीसीटीव्हीत कैद

बुलढाणा : – शहरातील कारंजा चौकात ७ एप्रिल रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. “कानमंत्र देतो” असे सांगत एका अज्ञात व्यक्तीने निवृत्त मुख्याध्यापक बंडू चव्हाण (वय ७९, रा. चेतनानगर) यांची १२ ग्रॅम सोन्याची अंगठी फसवणूक करत लंपास केली. संत-महात्म्यांची नावे घेत, धार्मिकता आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करत आरोपीने चव्हाण यांना भावनिक जाळ्यात ओढले. अंगठी रुमालात…

Read More

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला; चिखलीत खळबळ

चिखली – शहरातील स. द. म्हस्के रोड परिसरात एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख दुर्गाबाई जुलालसिंग राजपूत (वय ६५, रा. रामानंद नगर, चिखली) अशी झाली आहे. दुर्गाबाई राजपूत या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी ४ एप्रिल रोजी चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी…

Read More

मुख्याध्यापकाच्या मृत्यूमागे दबावाचा खेळ? एक वर्षानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

जानेफळ : – शिवाजी हायस्कूल, जानेफळचे मुख्याध्यापक रत्नाकर शिवाजी गवारे यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तब्बल एक वर्षानंतर मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, त्यांचा भाऊ, दोन शिक्षक आणि एका लिपिक अशा पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्च २०२४ रोजी मुख्याध्यापक गवारे यांनी कार्यालयात गळफास…

Read More

प्लॉटच्या वादातून युवकास घराच्या छतावरून फेकले! बुलढाणा शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

  ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बुलढाणा : प्लॉटवरून सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून दोघांनी एका युवकाला थेट घराच्या छतावरून खाली फेकून गंभीर जखमी केले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अमजद बागवान आणि शफीक बागवान यांच्याविरोधात २९ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रमेश बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्लॉटच्या वादात मध्यस्थी…

Read More

तक्रारीचा राग मनात ठेवून बाप-लेकावर प्राणघातक हल्ला; एक जण गंभीर, सात जणांवर गुन्हा दाखल!

  *( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )* बुलढाणा: शासकीय जागेवरील प्राचीन बारव तोडून बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार केल्याच्या रागातून सात जणांनी बाप-लेकावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना २५ मार्च रोजी लोणार शहरातील जमजम कॉलनी परिसरात घडली. मोहंमद रिजवान यांनी…

Read More

लाखनवाडा बु येथे घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

लाखनवाडा बु ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) – गावातील अनिस खान हाशम खान (वय ४०) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. २९ मार्चच्या मध्यरात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि कपाटातील रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीत दोन लाख वीस…

Read More

आसलगाव येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; हजारोंचे नुकसान

  आसलगाव : – गावातील रमेश शंकर येनकर यांच्या घराला ३ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. या आगीत घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, गृहउपयोगी साहित्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम २५ ते ३० हजार रुपये जळून खाक झाली. एकूण ७० ते ८० हजार रुपयांचे…

Read More

घरात कोणी नसताना 15 वर्षाच्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, बुलढाणा शहरातील घटना!

बुलडाणा – स्थानिक प्रबोधन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नववीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाग्यश्री वसंत बाहेकर (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी, ३ मार्च रोजी घरी कोणी नसताना तिने बेडरूममध्ये रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला. संध्याकाळी घरच्यांनी परतल्यानंतर तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी पुस्तक आणि चाकू देखील सापडले…

Read More

वाकोडीत एसएमएसद्वारे पाणीपुरवठ्याची पूर्वसूचना, शहरातील नागरिक मात्र अंधारात; नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल!

मलकापूर ( उमेश ईटणारे ): – शहरातील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम असून नागरिकांना पाणीपुरवठा कधी होईल याची कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक नागरिकांचे पाणी भरणे राहून जाते. याउलट, अगदी जवळ असलेल्या वाकोडी ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करून नागरिकांसाठी सोयीस्कर पद्धतीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. वाकोडी ग्रामपंचायतीचा नियोजनबद्ध पाणीपुरवठा वाकोडी ग्रामपंचायत नियमित चार दिवसांवर पाणीपुरवठा करते आणि पाणी…

Read More

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र लांबविले.. बुलढाणा बस स्थानकावरील घटना!

  बुलढाणा: शहरातील बसस्थानकावर दुपारच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सुधाकर कांबळे (वय ५१, रा. फॉरेस्ट कॉलनी, बुलढाणा) या शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलाकडे संभाजीनगर येथे जाण्यासाठी बुलढाणा बसस्थानकावर आल्या होत्या….

Read More
error: Content is protected !!