पेट्रोलच्या बहान्याने दुचाकी स्वाराला थांबवले अन् घात केला, चोरट्यानी खिशातील एका लाखाची रोकड आणि पाच हजाराचा मोबाईल लांबवला
मेहकर : मेहकर बायपासवर दुचाकीस्वाराला अडवून चोरांनी एक लाख रुपये नगदी व पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरला. ही घटना १७ जुलै रोजी घडली. आरेगाव येथील संतोष उकंडा साखले व त्यांचे नातेवाईक हे दुचाकीवरून तळणी (ता. मंठा जि. जालना) येथे गेले होते. तळणी येथून नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेऊन ते पुन्हा दुपारी आरेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले….
