Headlines

चिमुकल्यांना कमरेला बांधून मातेची तलावात उडी घेऊन आत्महत्या, खामगाव तालुक्यातील घटना

वृत्तसेवा खामगाव : पोटच्या दोन चिमुरड्यांना कमरेला बांधून पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने तालुक्यातील पिंप्री गवळी शिवारातील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर महिलेने कोणत्या कारणामुळे हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दहिगाव गावंडे…

Read More

मलकापूर रेल्वे परिवारातर्फे आगळावेगळा उपक्रम, अपघातात मृत्यू पावलेल्या प्रायव्हेट सफाई कामगाराला 3 लाखांची मदत देऊन साजरा केला स्वतंत्रता दिवस!

मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वतंत्रता दिवस कार्यक्रम रेल्वे स्टेशन मलकापूर येथे उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी स्टेशन प्रबंधक श्री डी वी ठाकूर, आरपीएफ इन्स्पेक्टर श्री राणाजी आणि वेगवेगळ्या विभागाचे डेपो इन्चार्ज आपल्या सहकर्मीसह उपस्थित होते स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे रेल्वेचे प्रायव्हेट सफाई सुपरवायझर स्वर्गीय अनिल जी…

Read More

ग्रामसेवकास शिवीगाळ करत मारहाण,एकाविरोधात गुन्हा दाखल! मेहकर तालुक्यातील घटना

डोणगावः मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे येथे ग्रामसेवकाच्या कामात व्यत्यय निर्माण करून, त्यास मारहाण केल्याप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. ग्रामसेवक दीपक भानुदास हुंबाड (५०) हे ग्रामपंचायत कार्यालयात असताना अमोल नामदेव महाजन (रा.अकोला ठाकरे) हे कार्यालयात आले., त्यांनी ग्रामसेवक दीपक हुंबाड यांना मारहाण करून शिवीगाळ…

Read More

तहसील चौकातील पान टपरी फोडून ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

बुलढाणा :- पान टपरी फोडून त्यातील ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील तहसिल चौकात उघडकीस आली. याप्रकरणी फिर्यादी चेतन चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरातील विदर्भ हाऊसींग सोसायटी येथील चेतन गजानन चोपडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांची तहसिल चौकात पानटपरी आहे. चोरट्यांनी पानटपरी…

Read More

घरात घुसून पतीला मारहाण, पत्नीचा लैंगिक छळ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!

देऊळगावराजा : एका ३५ वर्षीय विवाहितेचा लैंगिक छळ करण्यात आला. तसेच पीडितेच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. गावातील घराशेजारीच राहणाऱ्यांनी हे कृत्य केले, अशी तक्रार महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीनुसार, ही महिला घरी असताना शेजारीच राहणारा आरोपी सतीश बाबासाहेब शिंदे हा तिच्या घरी…

Read More

प्रेम प्रकरणातून पूर्व प्रियकराची हत्या, प्रेमात अडसर ठरत असल्याने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने घडवले हत्याकांड!

वृत्तसेवा लोणार : प्रतिनिधी प्रेम प्रकरणात अडसर ठरू लागल्याने प्रेयसीने आपल्या आधीच्या प्रियकराची गळा आवळून हत्या केली. यासाठी तिने तिच्या दुसऱ्या प्रियकराची मदत घेतली. लोणार सरोवराच्या परिसरातील अभयारण्यात ही घटना घडली. या धक्कादायक घटनेत प्रियकराचा मृतदेह जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला. पोलिसांच्या सखोल तपास अंती आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मृत प्रियकर आणि आरोपी…

Read More

उभ्या ट्रकला कारची धडक, अपघातात सानंदा परिवारातील तिघे जखमी!

खामगाव : जालना नजीक उभ्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातात खामगावातील सानंदा कुटुंबातील तिघे जखमी झाल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, सानंदा कुटुंबातील काहीजण पूणे येथून कार क्र. एमएच २८-एएन २१९१ ने खामगावकडे निघाले होते. दरम्यान पहाटे ४.३० वाजेच्या…

Read More

सततची नापिकी त्यात डोक्यावर “बँकेचे कर्ज’ अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

आसलगाव : सततच्या नापिकीमुळे त्यात डोक्यावर बँकेचे कर्ज या विवचनेतून येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण दयाराम बघे वय वर्ष ५२ यांनी दि.३० जुलै रोजी आत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षापासून सतत होत असलेल्या नापिकीमुळे व मागील वर्षी सुद्धा बोगस बियाणे मिळाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. अरुण बघे यांच्याजवळ १.११ आर इतकी…

Read More

घरात गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रोहिणखेड येथील घटना

धामणगाव बढे: राहत्या घरात गळफास घेऊन पंचवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रोहीणखेड येथे २६ जुलै रोजी घडली. विशाल राजू दसरे (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे. याबाबत नामदेव फकिरा दसरे यांनी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात विशाल याने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार,एक जखमी, पिंपळगाव काळे फाट्यावरील घटना

बी बी:- साखरखेर्डाः चिखली-मेहकर मार्गावर पिंपळगाव काळे फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा खेमेकर वय (४५) यांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना २४ जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा गणेश अप्पा खेमेकर हे चिखली येथून हिवरा आश्रम येथे…

Read More
error: Content is protected !!