Headlines

“चोराच्या पावलांना शेजाऱ्याच्या कानांची धार, चोरट्यास रंगेहाथ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात; शेगांव येथील घटना!

शेगाव :- शहरातील वार्ड क्रमांक २ मधील ओम नगरमध्ये १७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नाचा थरार उघडकीस आला. रात्री २.३० वाजताच्या सुमारास “चोर-चोर” असा गोंगाट ऐकून सुनिल जगन्नाथ ठोंबरे हे घराबाहेर आले. यावेळी त्यांनी पाहिले की, त्यांचे जावई दिगांबर संपतराव हाके यांच्या घरात चोरटा शिरलेला आहे.चोरट्याने घरातील आलमारी उघडून एका बॅगेत कपडे भरत असताना त्याला ठोंबरे…

Read More

रेल्वेत चोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश: शेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरटे मलकापुरातील पारपेठ भागातील रहिवासी

शेगाव: नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल १.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुमित प्रभाकर आग्रे (रा. ताथवडे रोड, पुणे) हे नागपूर-पुणे एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ झोपेत असताना त्यांची बॅग चोरीला गेली….

Read More

महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी, शेगांव पोस्टेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव :- शेगावच्या गौलखेड रोडवरील पवनपुत्र नगर येथील एका महिलेच्या घरी २० नोव्हेंबर रोजी दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन तिच्या आणि तिच्या मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार, अकोला येथील रहिवासी अमोल मच्छिंद्र बढे आणि दोन अन्य व्यक्ती महिलेच्या घरी आले, तिला शिवीगाळ केली आणि तिच्या कुटुंबाला जीवाने मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी, त्यांनी महिलेच्या दोन…

Read More

शेगावमध्ये दोन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

  शेगाव :- शेगावमध्ये २८ वर्षीय विवाहितेने दोन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दिली आहे. विवाहितेने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्या पतीसह पाच जणांनी संगनमत करून तिला हुंड्यासाठी मारहाण केली, शिवीगाळ केली, तसेच तिला घराच्या बाहेर हाकलून दिले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहिता सौ. ज्योती…

Read More

शेगावच्या मोदी नगरातून दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  शेगाव : येथील मोदी नगरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.याबाबत जगदीश प्रकाश घाटोळकर (वय ३६, रा. मोदी नगर, बाळापूर रोड, शेगाव) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली की, त्याने नेहमीप्रमाणे दुचाकी घरासमोर उभी करून ठेवली होती. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता, त्याची आई दार उघडून बाहेर गेली असता,…

Read More

शेगावमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  शेगाव : शेगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजू निंबटकर, तिरुमाला निंबटकर, भाग्यलक्ष्मी नरसिंगराज येडला (सर्व रा. राजुरा, चंद्रपूर), सागर बत्तुलवार, घनश्याम बत्तुलवार, मंगला बत्तुलवार, तसेच सागरचे मोठे बाबा, मोठी आई व एक पुजारी (सर्व रा. शेगाव) यांचा समावेश आहे. फिर्यादी मुलगी बल्लारशाह येथे मैत्रिणीच्या…

Read More

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शेगाव तालुक्यातील घटना!

  शेगाव : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना काल,९ ऑक्टोबरला शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील बोर्डी नदी पात्रात घडली. कृष्णा राजू फुटवाईक (१४ रा. बेलूरा) आणि शुभम गजानन पुरी (१४, रा. माटरगाव) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. जलंब पोलीस स्टेशन हद्दीत बेलुरा नदीपात्रात काल ही घटना घडली. दोघे पोहण्यासाठी…

Read More

घटस्थापनेच्या दिवशी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा शॉक लागून मृत्यू! डोलारखेड येथील घटना

जलंब : दोन युवकांना विद्युत तारेचा शॉक लागल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नजीकच्या डोलारखेड येथे घडली. येथून जवळच असलेल्या डोलारखेड येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गाची स्थापना करण्यात आली आहे. येथील एका सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी घटस्थापना होऊन आरतीही झाली. यानंतर शुभम गजानन देठे (वय २१) व गोवर्धन…

Read More

उपजिल्हा रुग्णालयासमोरून दुचाकीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल! शेगाव येथील घटना

शेगाव : शहरातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालया समोरून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ सप्टेंबर रोजी हरिदास तुलसिदास बायस्कर (४८) हे सामान्य रुग्णालयात कामानिमित्त आले असता त्यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच२८- एडी-३४३८ (किं.अ. ३० हजार रू.) रुग्णालयासमोर उभी केली होती. दरम्यान काम आटोपून परत आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही.यावेळी त्यांनी…

Read More

कोल्ह्याची दुचाकीला धडक, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एक जखमी, जलंब-खामगाव रोडवरील भोरशी नजीकची घटना!

जलंब : कोल्ह्याने दुचाकी ला धडक दिल्याने खामगाववरून दुचाकीने घराकडे परत येत असतांना दुचाकी स्वार 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जलंब-खामगाव रोडवर भोरशी नजीक घडली. या घटनेमुळे गावात व परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. याबाबत वृत्त असे की माटरगाव ता. शेगाव येथील रहिवाशी…

Read More
error: Content is protected !!