Headlines

शेती अकृषक प्रकरण मंजुरीसाठी ७५ हजारांची लाच घेताना सिव्हील इंजिनिअर रंगेहात पकडला! बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शेगाव : – शेतीचे अकृषक प्रकरण मंजूर करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिव्हील इंजिनिअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीला आज, ८ मे रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडून करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा नगररचना विभागामार्फत शेतीचे अकृषक प्रकरण मंजूर…

Read More

विवाहितेवर सासरच्यांचा अमानवीय छळ; माहेरून पैसे आणि मालमत्तेतील वाटा मागण्याचा दबाव; शेगाव येथील घटना

शेगाव : एका ३० वर्षीय विवाहितेवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहेरून एक लाख रुपये आणावेत तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हक्क मागावा, या कारणावरून पीडितेवर सातत्याने अत्याचार होत होते. पीडितेने शेवटी शेगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला हुरबानो…

Read More

ऑटोत सवाऱ्या घेण्याच्या वादातून चाकू हल्ला; एक गंभीर जखमी, शेगाव येथील घटना!

  शेगाव:- शेगाव येथे ऑटोत सवाऱ्या घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन चाकूने हल्ला झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात ऑटोचालक व त्याचा भाऊ जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. फिर्यादी गणेश श्रीराम बावस्कर (३०, रा. संविधान चौक, शेगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या सुमारास त्यांनी पाच सवाऱ्यांना आनंद विसावा येथे…

Read More

शेगाव डेपोच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये राहलेले २ लाखांचे दागिने प्रवाशाला परत

  शेगाव:- आजच्या स्वार्थी युगातही काही माणसे आपली निःस्वार्थ वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने समाजात माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून देतात. अशीच एक प्रेरणादायी घटना शेगाव आगारात समोर आली असून, येथील महिला वाहक सौ. आरती केनेकर यांनी बसमध्ये विसरलेले दोन लाखांचे दागिने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ घातला आहे. ही घटना शेगाव-तेल्हारा बस क्रमांक ९९६३मध्ये घडली. गौरी…

Read More

घरफोडी करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

शेगाव : – घरात कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी रविंद्र आनंदराव मुरुमकर (वय ३९, रा. गौलखेड रोड, पवारवाडी, शेगाव) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केलं की, ते २४ एप्रिल रोजी…

Read More

लांजुड फाट्यावर ३७ लाखांचा विमल गुटखा पकडला

जलंब : खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील लांजुड फाट्यावर जलंब पोलिसांनी सापळा रचून ३७ लाख रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा पकडला. आयशर गाडी (MH ०९ EM ९९९४) मधून गुटख्याची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत २३.६८ लाखांचा गुटखा व १५ लाखांची आयशर गाडी असा एकूण ३८.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा…

Read More

गजानन महाराज संस्थान पार्किंगमधून सेवाधाऱ्याची दुचाकी चोरीला

शेगाव – श्री गजानन महाराज संस्थानमध्ये सेवा देण्यासाठी आलेल्या सेवाधाऱ्याची दुचाकी पार्किंगमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ ते ९ एप्रिल दरम्यान घडली असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवंता वसंता ताले (वय ४०, रा. बोरीअडगाव, ता. खामगाव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ६ एप्रिल…

Read More

बसस्थानकासमोर उभ्या दोन मॅजिक गाड्यांना आग; शहरात खळबळ

शेगाव – शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका अघोषित घटनेने शहरवासीयांमध्ये खळबळ उडवली आहे. शेगाव बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन मॅजिक वाहनांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन्ही…

Read More

एकाच रात्री चार घरे फोडली, ६.४४ लाखांचा ऐवज लंपास; शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील घटना!

  जलंब – शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ४ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अमित आळशी यांच्या घरातून एकूण ५ लाख ६५ हजारांचे दागिने व रोकड चोरली….

Read More

स्टीअरिंग बिघडले, एस.टी. बस रस्त्यावरून घसरली; तिघे जखमी नादुरुस्त बसेसचा धोका कायम; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष?

शेगाव – शेगाव-पातुर्डा मार्गावर सोमवारी सकाळी धावणारी एस.टी. बस (MH-40 Y-5395) अचानक स्टीअरिंग बिघडल्याने रस्त्याच्या कडेला घसरली. सुदैवाने बस निंबाच्या झाडावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून, २५ प्रवाशांचा जीव संकटात सापडला होता. अपघातात नारायण सम्रत वानखडे (८५) आणि मोहम्मद फिरोजोद्दीन कुतुबोद्दीन (५४, दोघे रा. पातुर्डा) किरकोळ जखमी झाले, तर…

Read More
error: Content is protected !!