
अवैध गुटख्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले, ३६.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; बोराखेडी पोलिसांची कारवाई!
मोताळा : महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २८ बीबी ७४९१ हा संशयित वाहन खामगाववरून मोताळा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. पोलिसांनी बोराखेडी फाटा येथे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आढळून आला.या कारवाईत २५,८२,००० रुपये किमतीचा गुटखा आणि पिकअप वाहनाची किमत ११,००,००० रुपये…