Headlines

कोलवड शिवारात घरफोडी; 2 लाख ९३ हजाराचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

  बुलढाणा: कोलवड शिवारात घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातील सर्व सदस्य झोपेत असल्याची खात्री करून मागील दरवाजातून प्रवेश केला. घरातील लोखंडी दागिन्यांची पेटी उचलून ती शेतात नेली आणि त्यातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी दीपक गोपाळा काटे (वय ३९, रा. कोलवड)…

Read More

विजेचा शॉक लागून 50 वर्षीय इसम गंभीर जखमी, शेगाव तालुक्यातील घटना!

  शोेगाव : तालुक्यातील वानखेड येथील ५० वर्षीय इसम २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शेतात मोटर बंद करण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत त्यांना येथील साईबाई मोटे सामुदायिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा सतीश परसराम मोटे यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना…

Read More

नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ६० वर्षीय आरोपीला अटक; शेगांव तालुक्यातील धक्कादायक घटना!

  शेगाव – तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी माणिकराव दामोधर (वय ६०) याने मुलीला पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या घरात नेले आणि खोलीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास…

Read More

पोफळी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याची उत्साहात तयारी..

  मोताळा: भक्तीमय वातावरणात पोफळी येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा भक्तिरसात पार पडणार आहे. यंदा दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रींची आरती होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन…

Read More

कोलते इंजिनिअरिंगच्या एनएसएस शिबिराने ‘सात दिवस, सात संकल्प’ मोहिमेने धरणगावात केला सामाजिक सेवेचा महायज्ञ!

  मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सात दिवशीय श्रम संस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जि. प. प्राथमिक मराठी शाळा धरणगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटनासाठी प्रमुख…

Read More

शेतकरी महिलेला कापूस विक्रीत लाखोंचा गंडा; मलकापूर तालुक्यातील घटना

  मलकापूर :- शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला लाटण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. नात्यातील बेबी नीना घुले या शेतकरी महिलेला कापूस विक्रीच्या नावाखाली तब्बल ९ लाख १३ हजार ६०० रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे. भालगाव (रण) येथील बेबी घुले यांनी मागील दोन वर्षांतील १११ क्विंटल ४० किलो कापूस अमोल बबन घुले व त्यांच्या सहकाऱ्यांना विकला होता….

Read More

शेतात बांधलेल्या गायीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

  शेगाव: तालुक्यातील टाकळी नागझरी शिवारात गाईच्या चोरीची घटना समोर आली आहे. आशिष पांडुरंग कराळे यांच्या शेतात बांधलेली अंदाजे १५ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १२ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कराळे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाची मलकापूर कार्यकारणी जाहीर.. निवडणूक घेऊन करण्यात आली निवड

  मलकापूर : – पत्रकारांचे न्याय हक्कासाठी लढणारी देशव्यापी पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मिडियाच्या मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रिया दि. १३ फेब्रुवारी रोजी संघटनेचे राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे व जिल्हाध्यक्ष  सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने तालुकाध्यक्षपदी धीरज वैष्णव तर शहर अध्यक्षपदी समाधान सुरवाडे, कार्याध्यक्षपदी विलास खर्चे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची…

Read More

अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, इसमाविरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर तालुक्यातील घटना!

  मलकापूर : तालुक्यातील मौजे घिर्णी येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महादेव लक्ष्मण राऊत या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर मलकापूर शहर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आरोपीने पीडितेला धक्का मारून “तुला १० तारखेला पाहून घेतो” अशी धमकी दिली. त्यानंतर तो घराच्या गच्चीवर जाऊन…

Read More

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणांना भरधाव बसची धडक; एक ठार, दुसरा गंभीर जखमी, चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळील घटना!

  चिखली :- चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळ भीषण अपघातात एक तरुण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात आलोक श्यामलाल शिंगणे (३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय रमेश पट्टे (२६) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर चिखलीतील एका खासगी…

Read More
error: Content is protected !!