
भाडगणी ग्रामपंचायतीकडे गावकऱ्यांचे निवेदन; रस्ता दुरुस्ती व जनावरे हटविण्याची मागणी
मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) : भाडगणी गावातील बसस्टँड ते अविनाश जाधव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निवेदन दिले आहे. एकनाथ जाधव व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. सदर रस्त्यावर काही ठिकाणी जनावरे व म्हशी बांधल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास…