विजेचा शॉक लागून 50 वर्षीय इसम गंभीर जखमी, शेगाव तालुक्यातील घटना!

  शोेगाव : तालुक्यातील वानखेड येथील ५० वर्षीय इसम २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शेतात मोटर बंद करण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत त्यांना येथील साईबाई मोटे सामुदायिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा सतीश परसराम मोटे यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना…

Read More

नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ६० वर्षीय आरोपीला अटक; शेगांव तालुक्यातील धक्कादायक घटना!

  शेगाव – तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी माणिकराव दामोधर (वय ६०) याने मुलीला पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या घरात नेले आणि खोलीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास…

Read More

अनोळखी इसमाचा फुटपाथवर आढळला मृतदेह, शेगाव येथील घटना

शेगाव: स्थानिक स्टेट बँकेजवळील फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. सदर घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील अकोट रस्त्यावर राहणारे गजानन विश्वासराव साखरपांडे (वय ४३) हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करतात. विशेषतः निराधार व भिकारी व्यक्तींना अन्नदान करण्याचे कार्य ते नियमितपणे करत असतात. दररोजप्रमाणे काल रात्री ९.३०…

Read More

शेगावमध्ये लाखो भाविकांचा महापूर, संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदिर दिवसभर राहणार खुले

शेगाव :- विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन उत्साहात साजरा होत आहे. लाखो भाविकांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली असून, भाविकांच्या सेवेसाठी मंदिर १९ फेब्रुवारीपासून चोवीस तास दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. प्रगटदिनानिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान…

Read More

शेतात बांधलेल्या गायीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

  शेगाव: तालुक्यातील टाकळी नागझरी शिवारात गाईच्या चोरीची घटना समोर आली आहे. आशिष पांडुरंग कराळे यांच्या शेतात बांधलेली अंदाजे १५ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १२ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कराळे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध…

Read More

चोरटे भले हुशार; खिडकीतून घरात प्रवेश केला अन ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला.. शेगाव तालुक्यातील वरुड येथील घटना!

  खामगाव: शेगाव तालुक्यातील वरूड येथे चोरट्यांनी घरफोडी करत ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषीकेश पंजाबराव कोकाटे यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातून त्यांनी मुख्य दरवाज्याची कडी तोडून कपाटातील रोकड, दागिने आणि दोन मोबाईल चोरले. चोरीस गेलेल्या मालामध्ये ५० हजार रुपये रोख, १५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि दोन…

Read More

हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव येथील घटना!

शेगाव – हुंड्याच्या पैशावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या प्रकरणी तिच्या पतीसह नणंदांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी संगनमत करून तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची सक्ती केली. यास नकार दिल्याने तिचा छळ करण्यात आला व तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. फिर्यादी सौ. मेघा…

Read More

शेगाव स्थानकात नवजीवन एक्सप्रेसमध्ये अनोळखी वृद्ध महिलेचा आढळला मृतदेह, रेल्वे पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

  शेगाव :- नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्र. 12655) च्या जनरल डब्यात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. अकोला दिशेने जाणाऱ्या या गाडीत शेगाव रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान हा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला अंदाजे 60 वर्षांची असून तिची उंची 5 फूट 5…

Read More

शेगावमध्ये क्षुल्लक कारणावरून भाविकांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

  शेगाव :- येथील मंदिर परिसरात लहुजी वस्ताद चौकात दर्शनासाठी आलेल्या अकोला येथील भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम जगदीश श्रीवास (वय २९, रा. अकोला) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह गजानन महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर आले असता आरोपी कार्तिक वानखडे याने…

Read More

सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार; शेगाव येथील घटना

शेगाव: दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोन व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील चैन काढून घेण्याचा प्रकार ११ जानेवारी संध्याकाळी घडला. फिर्यादी सौ. माधुरी महेश गणगणे, वय ३०, रा. जुने महादेव मंदिर खिडकी, यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, त्या व त्यांच्या मुलीने संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना बाळापुर रोडवरील मुर्सलगाव…

Read More
error: Content is protected !!