पिंप्रीगवळी परिसरात अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान; शासनाने तातडीने मदतीची मागणी
मोताळा/ प्रिंप्री गवळी : – शनिवार रात्री झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिंप्रीगवळीसह परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मका, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांचे काढणीस तयार पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेती खरडून गेली असून पिकांना कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेला…
