मलकापूर:- मलकापूर नांदुरा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूमिपूजन करून नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र नारळ फोडण्याचा कार्यक्रम हा फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदातांच्या डोळ्यात धुळफेकण्यासारखा असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. मागील पंचवीस वर्षांमध्ये मलकापूर मतदारसंघाला सिंगापूर करण्याचे आश्वासन माजी आमदार यांनी दिले होते. मात्र 25 वर्षांमध्ये मलकापूर मतदारसंघाचा कुठलाही विकास न झाल्याने माजी आमदार चैनसुख संचेती यांचा विजयाचा यशाचा राजकीय आलेख जो प्रत्येक विधानसभा निवडणुकीत चढतच राहिला होता तो मात्र मलकापूर मतदारसंघात विकास न झाल्याने थांबला. नेहमीच विजयाचा विश्वास असतानाच त्यांना काँग्रेसचे राजेश एकडे आणि तब्बल 14384 मतांनी पराभूत केले. विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्या विजयासाठी पारपेठ भागातील अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने प्राण पणाला लावून रात्रीचा दिवस करून प्रचार करून तब्बल 15000 मतांची मोठी पेटी मतांच्या रुपात दिली. मात्र त्याच अल्पसंख्यांक समाजातील मतदात्यांच्या परिसरातील विकास करण्याचा विद्यमान आमदारांना विसर पडला असावा. मलकापूर नांदुरा मतदारसंघात काही दिवसापासून भूमिपूजन आणि नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र दुर्दैवाने एकही भूमिपूजन पारपेट भागात झाले नसल्याने अल्पसंख्यांक समाजाच्या मतदातांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. येत्या निवडणूकी मध्ये विद्यमान आमदारांना धडा शिकवण्याच्या प्रतिक्रिया मतदाता देत आहे.
तब्बल पंचवीस वर्षापासून मलकापूर मतदारसंघांमध्ये भाजपा चा एकहाती झेंडा अविरतपणे फडकत होता. मात्र मतदारसंघांमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून कोणताही विकास न झाल्याने जनता त्रस्त झाली होती. मोठ्या मोठ्या आश्वासनाच्या नावावरती लड्डू देण्याचा कार्यक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू होता. मात्र जनता त्रस्त होऊन अविरतपणे फडकत असलेला भाजपचा झेंडा महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश एकडे यांनी काढून टाकला. पंचवीस वर्षापासून विकास न झाल्याने विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्याकडून जनतेला भर भरून विकासाची अपेक्षा होती. मात्र गेल्या मागील पाच वर्षांमध्ये सुद्धा तीच स्थिती राहिल्याने पूर्ण तीस वर्ष पाहिजे तसा विकास न झाल्याने मलकापूर मतदारसंघाची अवस्था “आगीतुन निघून फुफाट्यात पडल्यासारखी” झाली आहे. तब्बल 30 वर्ष म्हणजे माजी आमदारांचे 25 व विद्यमान आमदारांचे 5 असे एकूण 30 वर्ष फक्त विकासाच्या नावावर फक्त लड्डू वाटण्याचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणूकित जनता कोणाला संधी देते हे बघण महत्वच ठरणार आहे.