( उमेश ईटणारे )
मलकापूर – आठवडी बाजाराच्या विकासासाठी 9 महिन्यांपूर्वी भूमिपूजन सोहळा पार पडला, परंतु आजही त्या प्रकल्पाची स्थिती त्याच जुन्या आणि डबघाईला गेलेल्या अवस्थेत आहे. डॉ. अरविंद कोलते यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं भूमिपूजन आता फक्त एक दिखावा बनून राहिलं आहे का? नागरिकांच्या अपेक्षांना काहीही वाट देणारे काम सुरू झालं नाही.विद्यमान आमदारांनी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या प्रकल्पाला चालना देण्याचं वचन दिलं होतं. त्यात पहिला टप्पा म्हणून 2 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. पण, त्यानंतर नऊ महिने उलटून गेले तरी एकही खऱ्या अर्थाने काम सुरू झालं नाही. जनतेला आश्वासन देण्याऐवजी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा फलक अजूनही दिसत नाही.
भूमिपूजन होऊन 9 महिने झाले, परंतु अद्याप रस्त्यावर खड्डे, आणि पुराणं होणाऱ्या गहाळ कामांबाबत लोकांना वाव वाटतंय. नागरिक आजही प्रश्न करत आहेत, “अखेर कधी सुरू होईल हे काम?” हे एकाच शब्दात सांगायचं झालं, तर फक्त आश्वासनांचा खेळ, बाकी काही नाही!आश्चर्य म्हणजे, दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही काम सुरू होत नाही. आजची परिस्थिती पाहता, आठवडी बाजाराचा विकास अजूनही केवळ कागदावरच आहे, आणि तो यापुढे कधी सत्यात उतरेल, हे सांगणं कठीण आहे.