मलकापूर( उमेश इटणारे ):- निवडणूकीच्या तोंडावर मलकापूर मतदार संघात विकासाचा गाजावाजा, करीत भूमीपूजन विद्यमान आमदारांच्या वतीने गेल्या काही दिवसात पासून सुरू आहे. गेल्या 25 वर्षात जो विकास झाला नाही, तो 5 वर्षात केला असल्याचे प्रतिक्रिया कार्यकर्ते सोशिअल मीडियावर देत आहे. मात्र प्रत्यक्षात विकास झाला का हे मतदाताच आपल्या भावना व्हाट्सएप च्या माध्यमातून देत आहे.
या बाबत सविस्तर असे की मलकापूर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून विद्यमान आमदारांच्या वतीने नारळ फोडून भूमीपूजनाची कार्यक्रम होत आहे. हे भूमिपूजन म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मतदारांच्या डोळ्यात धूळ फेकल्या सारखे असल्याचे सुशिक्षित मतदार बोलत आहे. गेल्या 5 वर्षा पासून मतदार संघात काहीसा विकास झाला, मात्र अधिका अधिक विकास झालेलाच नाही. त्यामुळे मतदारामध्ये नाराजीचे सूर उमटले असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. बहुतांश कामाचे फक्त नारळ फोडून कार्यक्रम झालेले आहे मात्र अद्याप पर्यंत कामे सुरू झालेली नाही. विकासाचा आणि भूमीपूजनाचा फक्त गाजा वाजा सुरू करून मतदात्याच्या डोळ्यात धूळ फेकल्या जात आहे असे चित्र मलकापूर मतदारसंघात मतदाता उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहे. काही मतदारांनी तर व्हाट्सएप ग्रुपवर विकास न झाल्याने विद्यमान आमदारांचा निषेध सुद्धा केला आहे. जर आपल्या मतदारसंघात मतदाताच निषेध व्यक्त करीत असेल तर त्याला विकास कसा म्हणावं साहेब ? हे तर दुर्दैचं आहे. पण जाऊद्या मतदाता सुशिक्षित आणि जाणकार आहे ते विद्यमान आमदारांना येथे निवडणुकीत धडा शिकवणार असल्याची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर विद्यमान आमदारांचा निषेध, काय होती ती पोस्ट
राजु भाऊ आपण निमंत्रण दिल्या बद्दल आभारी आहोत
पण आमच्या वार्डात नगर सेवक कॉग्रेस पक्षाचे होते तसेच कॉग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष यांचे नाते वाईक असुन शुन्य विकास झाले तसेच माननीय आमदार एकडे साहेब यांना मनापासून मतदान कॉग्रेस चे माजी नगराध्यक्ष श्री नारायण दास निहालाणी यांच्या विनंतीस मान देऊन मतदान केले पण आमच्या परीसरात शुन्य विकास झाले आमच्या अपेक्षा भंग झाल्या म्हणून आपल्या सर्व विकासकामांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता जाहिरपणे निषेध व बहिष्कार करीत आहे व जो पर्यंत कोंडवाडा रोड , सुनील टॉकीज रोड चे विकास
होत नाही तो पर्यंत आमचा प्रत्येक कार्यक्रमाला निषेध राहिल याची नोंद घ्यावी.