मलकापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप यांचा प्रशासनाला इशारा
मलकापूर:- “जिथे रस्ते नाहीत, तिथे अपघात टळणार कसे?” – अशी नागरिकांच्या तोंडी असलेली म्हण मलकापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तंतोतंत लागू ठरते. चाळीसबिघा, बिर्लारोड तसेच इतर वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असून पावसाळ्यामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांनी उघडं डोकं वर काढलं आहे. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्ता व खड्ड्याचा अंदाज न येता अपघातांच्या…
