Headlines

vidharbh

चांडक विद्यालयाच्या स्काऊट विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी प्रदर्शन

  मलकापूर :- नगर सेवा समिती द्वारा संचालित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या स्काऊट विद्यार्थ्यांनी दिनांक 15, 16 व 17 जानेवारी 2025 रोजी घाटबोरी येथे आयोजित भारत स्काऊट आणि गाईड संघटना बुलडाणा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. या मेळाव्यात शाळेच्या एकूण 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्काऊटर श्री….

Read More

सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार; शेगाव येथील घटना

शेगाव: दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोन व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील चैन काढून घेण्याचा प्रकार ११ जानेवारी संध्याकाळी घडला. फिर्यादी सौ. माधुरी महेश गणगणे, वय ३०, रा. जुने महादेव मंदिर खिडकी, यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, त्या व त्यांच्या मुलीने संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना बाळापुर रोडवरील मुर्सलगाव…

Read More

प्राथमिक मराठी आमची शाळा येथील विद्यार्थ्यांचे सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश

मलकापूर : लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूर द्वारा संचालित प्राथमिक मराठी आमची शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. माही अनिल नारखेडे हिने सायन्स ऑलंपियाड फाउंडेशनच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ऑलंपियाड या स्पर्धेत तिने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. माही हिने या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल रँक, झोनल रँक, आणि स्कूल रँक अशा सर्व स्तरांवर प्रथम क्रमांक प्राप्त करत…

Read More

रानडुकराच्या धडकेत ऑटो उलटली; एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर:- 19जानेवारी रोजी नरवेल गावात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चव्हाण कुटुंबीय मलकापूरहून काम संपवून ऑटोने घरी जात असताना, नरवेल गावाजवळ त्यांच्या ऑटोला रानडुकराने धडक दिली. या धडकेमुळे ऑटो रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात गणेश चव्हाण (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला….

Read More

सानिया कार गॅरेजला भीषण आग, 10 ते 12 कारसह स्पेअर पार्ट्स जाळून खाक; लाखोंचे नुकसान, मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर:- मलकापूरच्या बुलढाणा रोडवरील सानिया कार गॅरेजमध्ये आज, 20 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या 10 ते 12 चारचाकी वाहनांसह सुमारे 10 ते 15 लाखांचे स्पेअर पार्ट्स जळून खाक झाले. या दुर्घटनेत एकूण नुकसान लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गॅरेजमध्ये उभी…

Read More

महादेव मंदिरातील साहित्यावर चोरट्यांची काळी नजर.. गावकऱ्यांनी तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले, खुदनापूर येथील घटना!

जानेफळ: खुदनापूर येथील महादेव मंदिरातील धार्मिक वस्तू चोरी करून नेत असताना गावकऱ्यांनी तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने गावात खळबळ माजली असून आरोपींकडून चोरी केलेल्या वस्तूंसह त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी गावातील महादेव मंदिरातून तिघेजण काही वस्तू चोरी करून पळत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पाठलाग करून आरोपींना पकडले….

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहा – ना. प्रतापराव जाधव

मलकापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहावे असे आवाहन केंद्रीय आयुष्य तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी १९ जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित मलकापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन प्रसंगी केले. प्रारंभी बाजार समितीच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती…

Read More

राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मलकापूर – राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाचा भव्य दिव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यासाठी आज मलकापुर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष अमोल टप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील गोंड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या बैठकीत पारंपरिक पद्धतींसह आधुनिक तंत्रांचा अवलंब करून समाज बांधवांसाठी सोयीस्कर वधू-वर मेळावा आयोजित करण्याबाबत चर्चा…

Read More

राष्ट्रीय यशाच्या निमित्ताने कोलते महाविद्यालयात सन्मानाचा क्षण

  मलकापूर:- स्थानिक पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. महाविद्यालयाच्या आयडिया इनोव्हेशन प्रोजेक्टची निवड राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी देशाची राजधानी दिल्ली येथे करण्यात आली असून, या प्रकल्पाने महाराष्ट्राचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले आहे. महाविद्यालयातील प्रा. लेफ्टनंट मोहम्मद जावेद यांच्या नेतृत्वाखालील टीमने, ज्यामध्ये कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा. सुदेश फरपट, प्रा. विजय ताठे आणि…

Read More

दरोडेखोरांचा हैदोस; पशुवैद्यकीय डॉक्टरच्या पत्नीचा खून, डॉक्टर गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील दाभाडी येथे आज, १९ जानेवारी रोजी पहाटे दरोडेखोरांनी पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी दरोडा टाकत त्यांची पत्नी माधुरी टेकाळे यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेत गजानन टेकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास टेकाळे दाम्पत्याच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून मालमत्तेची लूट सुरू केली. विरोध…

Read More
error: Content is protected !!