
बुलढाणा रोडवर सलग तिसऱ्या दिवशीही कचरा गाडी गायब – व्यापाऱ्यांचा तीव्र संताप; जनतेचा पैसा सुविधांसाठी की ठेकेदाराला पोसण्यासाठी
मलकापूर (दिपक इटणारे): शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट होत असून, सलग तिसऱ्या दिवशीही बुलढाणा रोड आणि व्यापारी पट्ट्यात कचरा गाडी फिरकली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, मच्छर आणि रोगराईचा धोका वाढला आहे. व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित करत नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी…