Headlines

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांच्या दुचाकींवर चोरट्यांची काळी नजर.. गांधी चौकातून तीन दुचाकींची चोरी!

खामगावःगणपती विसर्जनाच्या दिवशी स्थानिक गांधी चौक भागातून तीन दुचाक्या लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तालुकाभरातून नागरिक खामगावला येत असतात. जागा मिळेल तेथे दुचाक्या लावून लोक मेनरोडवर मिरवणूक पाहण्यासाठी जातात.अशाच प्रकारे १७ सप्टेंबर रोजी काहीजण गांधीचौक परिसरात दुचाक्या उभ्या करुन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरटयांनी जयहिंद इलेक्ट्रीकल्स समोरुन
एचएफ डिलक्स दुचाकी क्र. एमएच २८ एक्स ३०७२, स्प्लेंडर क्र. एमएच २८ बीव्ही १७६० व अॅक्टीव्हा क्र. एमएच२८ एएम ०२७६ या तीन दुचाक्या लंपास केल्या. दुचाकी मालक मिरवणूक पाहून परत आले असता त्यांना दुचाक्या दिसून आल्या नाहीत. त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण दुचाक्या मिळाल्या नाही. अखेर
याबाबत त्यांनी पोस्टेला तक्रारी दिल्या.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम ३०३ (२) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *