शेगाव:- बचतगटाच्या पैशांवरून वाद निर्माण झाला व एकाने लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना ईदगाह प्लॉट येथे ३१ जुलै रोजी रात्री घडली.याबाबत शेख अरबाज शेख अब्दुल वय २२ वर्षे रा. इदगाह प्लॉट शेगांव यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, गटाचे पैशाच्या कारणावरून आरोपी सलमाबी अलीम शेख, शेख अलीम ( पुर्ण नाव माहित नाही) शेख सोहील शेख अलीम, नाजीया परवीण शेख रइस सर्व रा. इदगाह प्लॉट शेगांव यांनी संगनमत करुन मला व माझ्या बहिणीला शिवीगाळ करुन शेख अलीम यांने माझ्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. व माझ्या बहिणीला सुध्दा हातावर मारहाण केली. व जिवाने मारण्याची धमकी दिली.
मला डोक्याला मार लागल्याने ओषधोपचार करुन आजरोजी पोलीस स्टेशनला येवुन रिपोर्ट देत आहे. त्यांचे पासून आमचे जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्याचेवर कार्यवाही व्हावी अशा फिर्यादीचे रिपोर्ट व मेडीकल सर्टिफिकेट वरून कलम १८८(१), ३५२,३५१(२), ३(५) भा. न्या. सं. नुसार गुन्हा दाखल करुन तपास नापोकों निलेश गाडगे यांचेकडे देण्यात आला आहे. (ता.प्र.)