मलकापुर :- विदर्भाची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र शेगावची ख्याती संपूर्ण जगामध्ये आहे तेथूनच शेगावला श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी प्रगट दिन, एकादशी आणि गुरुवारला हजारोंच्या संख्येने शेगावला येत .” नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते” गजरामध्ये तल्लीन होतात.यातच विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावांमध्ये शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर व समाधी स्थळाची जस्याची तशी उभारणे गावाच्या मुख्य प्रवेश दरावर व गावातून जाणाऱ्या नदीच्या काठी मंदिर उभारण्यात आले आणि योगायोग म्हणजे शेगाव येथील मंदिराच्या जागेचा गट नंबर आणि घिर्णी येथील जागेचा गट नंबर हा एकच आल्याने भक्तांमध्ये येथील मंदिराचे महत्त्व वाढले आणि दर गुरुवार ला पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात . त्यातच संपूर्ण मलकापूर शहरातील भाविक भक्तांनी दर गुरुवारला पंचमुखी हनुमान मंदिर ते प्रती शेगाव घिर्णी ला पायदल वारी करत एक अनोखा इतिहास रचला त्यात म्हणजे १ ऑगस्ट २०२४ रोजी या शंभर वाऱ्या पूर्ण केल्या त्या निमित्ताने गुरुवारला हजारो भावी भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये श्रींची पालखी खांद्यावर घेऊन अभंगाच्या तालावर नाचत गाजत 100 व्या पायदल वारीचे समारोप केले यामध्ये संपूर्ण मलकापूर नगरातील तसेच घिर्णी गावातील हजारो भाविक भक्त पायदल वारीमध्ये सहभागी झाले होते.