आसलगाव : सततच्या नापिकीमुळे त्यात डोक्यावर बँकेचे कर्ज या विवचनेतून येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण दयाराम बघे वय वर्ष ५२ यांनी दि.३० जुलै रोजी आत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षापासून सतत होत असलेल्या नापिकीमुळे व मागील वर्षी सुद्धा बोगस बियाणे मिळाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. अरुण बघे यांच्याजवळ १.११ आर इतकी शेती असून दिवसेंदिवस बँकेचे कर्ज वाढत असल्याने ते रात्रंदिवस चिंतेत राहायचे, त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा जळगाव जामोदचे ८९ हजार रूपये कर्ज आहे अशी माहिती
त्यांचा भाऊ बाळकृष्ण दयाराम बघे यांनी दिली. त्यातच दरवर्षी नापिकी बोगस बियाणे शेतमालाला भाव नसणे, दुबार पेरणीचे संकट त्यातच मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण त्यांचा सगळ्यांचा सांभाळ करून अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या. मात्र सतत आसमानी सुलतानी संकटांशी दोन हात करता करता ते अखेर हतबल होऊन त्यांनी जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी, २ मुले असा बराच मोठा परिवार आहे.
सततची नापिकी त्यात डोक्यावर “बँकेचे कर्ज’ अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..
