मलकापूर – ग्राम कुंड बु! येथे लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यामध्ये वैभव तितरे (वय 23), त्याची आई आशा तितरे व भाऊ गौरव तितरे यांना विष्णू कवळे व त्यांच्या नातेवाईकांनी काठी व वीटांनी जबर मारहाण केली. यात गौरव तितरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शहर पोलिसांनी विष्णू नारायण कवळे, हरीनारायण कवळे, किरण गोपाल कवळे व आदित्य गोपाल कवळे यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप मोकाट आहेत. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.