मलकापूर (प्रतिनिधी): बांगलादेशातील हिंदू, जैन, बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने १५ डिसेंबर रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. गोविंद विष्णू महाजन विद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारोंची उपस्थिती होती.या मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यात भारत सरकारने जागतिक मानवाधिकार संघटनांवर दबाव टाकून अत्याचार थांबवण्याची आणि इस्कॉन मंदिराचे संत स्वामी चिन्मयानंद यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली आहे.यावेळी हिंदुत्ववादी संघटनांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बांगलादेशातील अत्याचारांविरोधात जागतिक पातळीवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन या मोर्चातून करण्यात आले.