खामगाव : – येथील महात्मा गांधी उद्यानाजवळ बस थांब्यासमोर १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी उद्यानाजवळील बस थांब्यासमोर शेख कमरुद्दीन शेख कयामोद्दीन (३०), शेख सलमान शेख सलीम (२४), कलीमोद्दीन अजीसद्दीन मिर्झा (३०), शेख शकील शेख शकूर (३०), आणि शेख इरफान शेख कलाम (४०) (सर्व रा. माटरगाव) हे एकमेकांशी वाद घालत होते. वाद विकोपाला गेल्याने त्यांनी लोखंडी रॉडने एकमेकांना मारहाण केली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चंद्रशेखर बावस्कार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे शहर पोलिसांनी संबंधित पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १८९, १९१ (३), १९४ (१) (२), ११८ (१), ११५ (२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोंडाने करीत आहेत.