मलकापूर ( उमेश इटणारे ) :- मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अँड हरीश रावळ यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयाने स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण घेतले आहे. रावळ यांच्या निर्णयामुळे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. 2019 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर रावळ यांना पक्षाने भाजपामधून आलेल्या राजेश एकडे यांना उमेदवारी दिली होती. एकडे यांनी रावळ यांना वचन दिले होते की, ते पुढील पाच वर्षांत कार्य करतील, पण या वचनाच्या भंगामुळे रावळ यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते की, “आपल्याला पूर्ण ताकदीने लढायचे आहे; माघार घ्यायची नाही.” त्यामुळे रावळ यांचे कार्यकर्ते जोरदार प्रचारात उतरले होते.आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. रावळ यांनी काल अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतला रावळ यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरला.कार्यकर्त्यांना या निर्णयाबाबत काहीही पूर्वसूचना नसल्यामुळे असंतोषाची भावना वाढली आहे. रावळ यांनी अर्ज मागे घेतल्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे विविध तर्क व चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात रावळ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या सर्व परिस्थितीमध्ये मलकापूर नांदुरा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत काय होणार, हे लक्षात पाहणे तितकेच महत्वाचे ठरेलं. रावळ यांची अचानक माघार कार्यकर्त्यांसाठी नवा विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण करते.