Headlines

खामगाव बस स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंड येथील सराईत चोरट्यास अटक,42 हजाराचा मुद्देमाल जप्त, खामगाव पोलिसांची कारवाई!

खामगाव : स्थानिक शहर पोस्टेला तक्रारीवरुन मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या घटनेतील झारखंड येथील मोबाईल चोरट्यास ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोपाल सुरेशराव पवार वय ३९ रा. खडकी अकोला यांनी ७ सप्टेंबर रोजी शहर पोस्टेला फिर्याद दिली की मी शहरात कामानिमित्त आलो होतो. दरम्या येथील बसस्थानक येथे माझा मोबाईल किंमत ७ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केला. या फिर्यादीवरुन कलम – ३०३ (२) भारतीय न्यायसंहिता २०२३ प्रमाणे – नोंद करुन तपासात घेतले. सदर गुन्ह्याचे तपासात – मा. पो. आर. एन. पवार यांचे मार्गदर्शनात सीसीटीव्ही चेक करुन आरोपी शोधण्यासाठी पोकाँ गणेश कोल्हे, अमर ठाकूर, अंकुश गुरुदेव, – राहुल थारकर यांचे पथम रवाना होवून गुन्ह्यातील – आरोपी कृष्णकुमार अर्जुन महतो वय २८ व १४ – वर्षाचा बालक दोघे रा. नयाटोल कल्याणी – महाराजपूर जि. साहेबगंज झारखंड यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात चोरी गेलेला अॅन्ड्राईड मोबाईल किं. ७ हजार रुपये, रियलमी, – ओप्पो, रेडमी असा ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त – करण्यात आला तसेच पेट्रोलिंग दरम्यान कलम ३७९, ३४ भान्यासं गुन्ह्यातील फरार आरोपी – दिलवर अर्जुन महतो वय ३१ रा. नयाटोल झारखंड याला सुध्दा अटक करण्यात आली.सदर कारवाई खामगाव शहर पोलिस स्टेशन व डीबी पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!