मलकापूर (दिपक इटणारे) — कधी आयुष्याच्या संघर्षात एक हात पुढे करून मदतीसाठी उभे राहिलेले ‘बंडूभाऊ’, आज हजारो हातांनी आशीर्वाद घेणारे झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तोच साधेपणा आहे, डोळ्यात तीच माणुसकी आहे, आणि हृदयात लोकांसाठी झपाटून काम करण्याची तीच जिद्द आहे.
काल मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक मा. सुहास चवरे (बंडुभाऊ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो प्रेमाचा महापूर उसळला, तो केवळ एक राजकीय कार्यकर्त्याचा गौरव नव्हता, तर एका सत्यनिष्ठ, संवेदनशील आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाच्या जीवनमूल्यांचा सन्मान होता. बंडुभाऊ हे माणुसकीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. गरजवंतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर, तरुणांमध्ये प्रेरणास्थान, आणि शहराच्या विकासासाठी झपाटलेले नेतृत्व अशी त्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये प्रतिमा आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी, शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी होती.
फुलांच्या तोऱ्यांपासून ते मिठायांनी भरलेल्या थाळ्यांपर्यंत, आणि त्याहूनही महत्त्वाचं – जनतेच्या निस्सीम प्रेमाने परिपूर्ण हा दिवस, त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा ठरला. युवक, महिला, व्यापारी, वयोवृद्ध नागरिक – साऱ्यांनी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांचं पुढचं जीवन आरोग्यदायी व यशस्वी होवो अशी प्रार्थना केली.
“माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर तुम्ही मला आधार दिलात… प्रत्येक संकटात मी तुमच्यामुळे उभा राहिलो… माझ्या हातात कोणतेही मोठे पद नाही, पण तुमच्या आशीर्वादांची शक्ती आहे…
म्हणूनच मी तुमचा आहे… आणि कायम तुमचाच राहीन…”हे प्रेम म्हणजे एक जबाबदारी आहे. मी केवळ नगरसेवक म्हणून नाही, तर तुमचा एक भाऊ, मित्र, मुलगा म्हणून प्रत्येक वेळी तुमच्यासोबत उभा राहीन. तुमच्या प्रत्येक हाकेला हाक” देणं हेच माझं खरं काम आहे.”
सुहास उर्फ बंडूभाऊ चवरे
मा. नगरसेवक