वाचकांच्या प्रतिसादामुळे विदर्भ लाईव्हने गाठला दोन लाखांचाटप्पा , विदर्भलाईव्हच्या वाचकांचे मनापासून आभार!

मलकापूर ( उमेश इटणारे ):- विदर्भ लाईव्ह च्या वाचकांनी 2 लाखाचा पल्ला गाठलेला आहे. अंत्यत निर्भीड पणे सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम विदर्भ लाईव्ह अविरतपणे करीत आहे. यामुळे विदर्भ लाईव्हची लोकप्रियता वाढली आहे. 2 लाख पेक्षा अधिक वाचक दररोज बातमी वाचत असतात असे गूगल द्वारे समजते आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातुन प्रसारित होणारे विदर्भ लाईव्ह आहे. मागील काही वर्षा पासून बुलढाणा जिल्हा तसेच संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्रातील बातम्या विदर्भ लाईव्ह कव्हर करीत असते. सत्यता पळताळणी विना कोणतीही बातमी विदर्भ लाईव्ह प्रकाशित करीत नाही. शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्याना निर्भीड पणे वाचा फोडून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम विदर्भ लाईव्ह ने केले आहे व या पुढेही अश्याच पद्धतीने सेवा देण्याचे काम विदर्भ लाईव्ह निर्भीडपणे करेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहे. याबाबत सर्वच पक्षांनी आपापल्या यादी सुद्धा जाहीर केले आहे. मात्र मलकापूर मतदारसंघाचे पहिल्या यादीत नाव नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. मलकापूर मतदारसंघातून आमदारकीच्या लिस्ट मध्ये माजी. आमदार चैनसुख संचेती, आमदारकीसाठी युवा चेहरा मनीष लखानी तसेच सभापती शिवचंद्र तायडे यांची वर्णी लागली आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत या तिघांपैकी कोणत्याही उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. या मध्ये मनीष लखानी यांचे नाव आघाडीवर असताना सोशल मीडिया वरती मनीष लखानी यांना उमेदवारी जाहीर झाली ? अश्या अफवाचा भूकंप आला होता. सर्वांनाच उत्सुकता होती की उमेदवारी कोणाला मिळणार. या बाबत विदर्भ लाईव्ह नी मनीष लखानी यांना उमेदवारी जाहीर ? अश्या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी बघण्यासाठी विदर्भ लाईव्हचे वाचक तुटून पडले, व अवघ्या एका दिवसांमध्ये विदर्भ लाईव्हच्या वाचकांची संख्या 1,87,420 एवढी झाली असे गूगल द्वारे कळाले आहे. जवळपास 2 लाखा वाचकां पर्यंत पोहचणार पाहिले डिजिटल मीडिया आहे. यामुळे दिवसांदिवस विदर्भ लाईव्ह वाचनकांची लोकप्रियता वाढत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!