Headlines

विश्व् हिंदू परिषद,दुर्गा वाहिनी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

मलकापूर दि.21जून 2024
स्थानिक : आंतरराष्ट्रीय योगदिन निमित्ताने क्रीडा भारती, विश्व् हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, रा. स्व. संघ, व ली. भो. चांडक विद्यालय यांच्या संयुक्तरीत्या विद्यालयाच्या प्रांगणात योगासने व प्राणायाम करून मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी भारतमातेचे पूजन करूनकार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच योग गुरु श्री भरतभाई शहा, महेंद्रजी संचेती, मोहन आसेरकर यांच्या मार्गदर्शनात विविध योग आसने करण्यात आली. क्रीडाभारतीचे शिक्षक गणेश तायडे यांनी समंत्र सूर्यनमस्कार करून घेतले.
दरम्यान भरत भाई शाह यांनी शरीर संचालन, योगासने, व प्राणायाम घेऊन योगासनाचे दैनंदिन जीवनातील महत्व विषद केले. या प्रसंगी सौ. अश्विनीताई काटे यांनी सद्गुरु स्तवन गायिले.
नगरातील योगप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.कर्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *