मलकापूर:- राज्यात 10 जून ते 14 जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा पूर्ण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. त्यापैकी पद्मश्री डॉ. व्ही बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज मलकापूर येथील केंद्रावर सुद्धा संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात आली होती. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज बुलढाणा जिल्ह्यामधील एक नावाजलेले कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर लॅब उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा, वायफाय सेवा विद्यार्थ्यांसाठी 24 तास उपलब्ध आहेत . कॉलेजमध्ये तज्ञ आणि अनुभवी असा प्राध्यापक वर्ग आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारत सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या सरकारी परीक्षा मोठ्या प्रमाणात कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालय हे केंद्र बनवून येथे राबविण्यात येतात. या कॉलेजमध्ये कुठलीही सरकारी परीक्षा ही नियमाने व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेतल्या जातात. सरकारी परीक्षा सुरू असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण दखल ही महाविद्यालयाच्या प्रत्येक प्राध्यापक वर्गाकडून तसेच प्राचार्य कडून घेतली जाते.
कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये छोट्या हॉल पासून ते मोठ्या हॉल पर्यंत महाविद्यालयाचा सर्व परिसर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपात ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर महाविद्यालयासारखा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार परीक्षा दरम्यान कोलते महाविद्यालयात घडत नाही.
कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन या परीकक्षेसाठी महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख प्रा. महेश शास्त्री यांची परीक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती तर महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन ही परीक्षा कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शासन नियमात संपन्न झाली, अशी माहिती कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी प्रसिद्धीपत्रकांशी बोलतांना दिली.