Headlines

आपण या वृद्धाला ओळखता का? ओळखत असाल तर बुलढाणा पोलिसांना सांगा, जयस्तंभ चौकात आढळला वृद्धाचा मृतदेह..

बुलडाणा :- आपण या वृद्धाला ओळखता का ओळखत असाल तर बुलढाणा पोलिसांना सांगा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात एका अज्ञात वृद्ध इसमाचा मृतदेह आज ६ जुलैच्या सकाळी आठ वाजताच्या सुमारास दिसून आला.या वृद्धाचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षाचे आहे.अनोळखी वृद्ध शहरातील जयस्तंभ चौकातील बुलढाणा अर्बनच्या इमारतीसमोर पडलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अनोळखी वृद्धाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय तपासातून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या हा मृतदेह सामान्य रुग्णालयातच ठेवण्यात आला असून ओळख पटविण्याचे आवाहन बुलढाणा पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!